BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ नोव्हें, २०२२

भीषण अपघातात अकरा मजुरांचा मृत्यू !




 शोध न्यूज : बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली असून मध्यरात्रीच्या नंतर झालेल्या या अपघातात महाराष्ट्रात परतत असलेल्या मजुरावर काळाचा घाला घातला गेला आहे.

कारमधील सर्वजण अमरावती येथून आपापल्या घरी परत निघालेले असताना मध्यरात्रीनंतर कार चालकाला डुलकी लागली आणि त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती समोरून येणाऱ्या एका बसवर जाऊन आदळली. बसला जोरादार धडक दिली गेल्याने हा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी जोरदार होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. महाराष्ट्रात काम करणारे मजूर हे दिवाळी आणि छटपूजेच्या निमित्ताने आपापल्या गावी गेले होते. सण साजरा करून ते परत येत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात ११ मजूर जागीच ठार झाले असून यात ५ पुरुष आणि ४ महिला मजुरांचा समावेश आहे. दोन लहान मुलांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशच्या बैतुल येथे गुडगाव ते भैसदेही दरम्यान मध्यरात्री ही घटना घडली आहे.


अत्यंत भीषण असा हा अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली. भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  अपघातग्रस्त वाहनात मृतदेह अडकून पडले होते. कटरच्या मदतीने गाडी कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. कष्टकरी मजुरांचा या अपघातात मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत असून अंगावर काटा आणणारा हा अपघात अकरा कुटुंबाचा आधार नष्ट करून गेला आहे. (Eleven laborers died in a terrible accident) तवेरा गाडीच्या चालकाला झोप आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.   





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !