या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या दोघांच्या डोक्याला जबर मार लागून जखमा झाल्या आणि या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ठार झालेले दोघे हे सासरे जावई होते. सासरे रणजित शेंडे व जावई प्रभात बावनकर हे दोघे मृत्युमुखी पडले तर अन्य आठ जखमी झाले. प्रभातची पत्नी स्वाती बावनकर (वय २६), सासू रंजना रणजित शेंडे (वय ५०), संजय लक्ष्मण कनोजिया ( वय ४३), प्रमिला विठ्ठल पडधान ( वय ६०), छाया रामचंद्र शेंडे ( वय ५०), माधुरी धर्मराज सोनटक्के ( वय ३०), ओम धर्मराज सोनटक्के (वय १०), वैष्णवी धर्मराज सोनटक्के ( वय ७), लावण्या विजय गोलाईत (वय ६), सिद्धिक प्रभात बावनकर ( वय ५) हे जखमी झाले आहेत. जखमींनी अपघातात जबर मार लागला आहे.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बावनकर हे मूळचे बालाघाट येथील रहिवासी असून, बंगळुरू येथील एका आयटी कंपनीत कामाला होते. तर त्यांचे सासरे रणजित शेंडे हे फर्निचरचे काम करतात. दिवाळीच्या सुट्टीमुळे प्रभात पत्नी व मुलांसह हजारीपहाड येथे सासरच्या घरी आले होते. प्रभात, शेंडे कुटुंब आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी महाराष्ट्रातील विविध धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याप्रमाणे ते परळी वैजनाथ, पंढरपूर, शिर्डी असा प्रवास करीत होते.
अपघातात जखमी झालेल्यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. चार लहान मुले या अपघातात जखमी झाली होती तर त्यांच्या डोळ्यादेखत दोघांचा मृत्यू झाला होता. अपघाताचे चित्र पाहून आणि दोघांचा मृत्यू पाहून लहान मुलांना मोठा धक्का बसला आहे तर नातेवाईक प्रचंड शोकाकुल झाले आहेत. (Devotees' car accident, two killed on the spot) अपघात होताच ट्रकचालक हा आपला ट्रक घेवून लगेच पसार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !