BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ नोव्हें, २०२२

काळी टोपी आणा, एक लाख रुपये मिळवा' ! बीड शिवसेनेकडून बक्षीस !

 


शोध न्यूज : काल धोतरावर तर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याच्या टोपीवर शिवसेनेने बक्षीस जाहीर केले असून छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याने महाराष्ट्र आजही खवळलेलाच आहे.


वारंवार वादग्रस्त विधाने करून वादंग निर्माण करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी संतापजनक विधान केले आहे त्यामुळे महाराष्ट्र खवळला आहे. कालपासून राज्यात सगळीकडे राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधी वातावरण निर्माण झालेले असून राज्यपाल हटावची जोरदार मागणी सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे काही नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोश्यारी यांची बाजू घेतली असल्यामुळे त्यांचाही निषेध होताना दिसत आहे. महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा राष्ट्रपुरुषाचा अनादर होत आहे ही बाब सामान्य माणसाला देखील आता असह्य झाली आहे. 


राज्यात सगळीकडे तीव्र स्वरुपात निषेध होत असतानाच पुण्यात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फलक लावून निषेध करीत कोश्यारी यांचे धोतर फडणाऱ्या आणि फेडणाऱ्यास लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले तर सोलापुरात शिवसेनेने (उद्धव ठाकरे) हेच धोतर फाडणाऱ्यास दीड लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी या बक्षिसाची घोषणा केली आहे. यातून राज्यपाल यांच्या विधानावर उफाळलेला संताप व्यक्त होत असतानाच आता धोतरावरील बक्षीस 'काळ्या टोपी' पर्यंत येवून पोहोचले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची टोपी आणणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस बीड शिवसेनेने (ठाकरे गट) जाहीर केले आहे. 


बीड शिवसेना (ठाकरे) राज्यपाल यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाली असून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी 'राज्यपालांची काळी टोपी आणा, एक लाख रुपये मिळवा' असं बक्षीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी घोषणा केली आहे. (Bring a black hat and get one lakh rupees)  याचवेळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातही अत्यंत आक्रमक घोषणा देण्यात आल्या. दरम्यान राज्यात सगळीकडेच शिवप्रेमी आक्रमक झाले असून राज्यपाल कोश्यारी यांना हटविण्याची मागणी थेट महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे देखील करण्यात आली आहे. शिवरायांचा अपमान करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न होत असताना भाजपने मात्र साधा निषेधही नोंदला नाही त्यामुळे शिवप्रेमी भाजपविरोधी आक्रमक होऊ लागले आहेत. 


   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !