शोध न्यूज : आनंदाने झोका खेळणाऱ्या एका पंधरा वर्षे वयाच्या मुलास गळफास लागला आणि त्याचा जागीच मृत्यू होण्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.
सणावाराला झोके खेळण्याची परंपरा आहे तसे अनेक लहान मुले घरात, अंगणात अथवा पडवीत झोके घेण्याचा आनंद घेत असतात परंतु या झोक्यानी त्यांची आनंद कायमचा हिरावून घेतला असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. लहान मुले झोके खेळताना आई वडील अथवा अन्य कुणी जवळ असणे किती आवश्यक असते हे अशा घटनानंतर लक्षात येते. गोल गोल फिरत झोक्याची दोरी मुलांच्या गळ्याभोवती आवळली जाते आणि त्यात मुलाचा मृत्यू होतो. (Fifteen-year-old boy hanged while playing swing) अशा प्रकारच्या घटना या आधीही घडल्या असून आता पुन्हा अमळनेर येथील मुंदडा नगर येथे राहणाऱ्या एका पंधरा वर्षे वयाच्या मुलाचा बळी गेला आहे.
शहरातील ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये नवव्या इयत्तेत शिकणारा वेदांत संदीप पाटील या मुलाला झोक्याचा गळफास बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झोका खेळत असताना वेदांतला दोरीची फाशी लागली गेली आणि क्षणार्धात त्याचा मृत्यू झाला. वेदांतला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. वेदांत याचे आई आणि वडील हे दोघेही शिक्षक आहेत. मुले खेळत असताना मोठ्या माणसांचे लक्ष असल्याची आवश्यकता असते हे पुन्हा एकादस अधोरेखित झाले आहे. खेळताना धोका होण्याच्या अनेक घटना घडत असतात पण पालक याकडे गंभीरपणे पहात नाहीत. झालेल्या या दुर्लक्षाची फार मोठी किंमत नंतर मोजावी लागते. अशा घटना घडू नयेत म्हणून पालकांनी सदैव सावध असण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !