BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० नोव्हें, २०२२

मुलाने जन्मदात्या पित्याला जिवंत पेटवून दिले !

 



शोध न्यूज : ज्याला काळजात जपलं त्याच मुलाने पिता - पुत्राच्या नात्याला कलंक लावत आपल्याच पित्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची अमानवी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे.


आपल्या मुलाच्या सुखासाठी पिता आपले आयुष दु:खात, संकटात घालवतो, मुलाच्या जन्मापासून त्याचे भवितव्य घडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करतो, आपण अर्धपोटी राहून मुलाचे कोडकौतुक सांभाळतो परंतु तोच मुलगा मोठा झाला की त्याच पित्याच्या जीवावर उठतो. अशा अनेक घटना समाजात घडताना दिसतात. कोल्हापूर येथील तर एका 'दिवट्या' चिरंजीवाने बापाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक आणि नात्याला कलंकित करणारी घटना समोर आली आहे. कागल तालुक्यातील व्हन्नुर गावात घडलेल्या या घटनेने मानवतेलाच हादरा दिला आहे.  मुलासाठी आयुष्यभर झिजलेल्या बापाला त्याच मुलाने जाळून मारण्याचा निंद्य प्रयत्न केला आहे. 


शिवाजी हजारे नावाच्या मुलाने आपल्या वडिलांना, देवबा हजारे यांना  मारण्याचा कट रचला आणि त्यानुसार त्याने पुढील हालचाली केल्या. वडील शौचालयात गेल्यानंतर मुलाने बाहेरून कडी लावली आणि पेट्रोल टाकून पेटवून दिले. जिवंत जाळून मारण्याचा त्याचा कट मात्र पूर्ण झाला नाही. मुलाने लावलेल्या आगीत वडील गंभीर स्वरुपात भाजले गेले आहेत. विशेष म्हणजे या कट कारस्थानात मुलगा शिवाजी याची पत्नी सरला ही देखील सहभागी झाली होती. वडिलांना जाळून मारून टाकण्याचा मोठा कट देवबा हजारे यांच्या मुलाने आणि सुनेने रचला परंतु यातून देवबा थोडक्यात बचावले आहेत. भाजल्यामुळे मात्र ते गंभीर जखमी झाले आहेत.


सकाळच्या वेळीच शिवाजी आणि सरला यांनी हे कारस्थान केले. राहत्या घराच्या समोरच त्यांनी देवबाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा शिवाजी हजारे हा आपल्या वडिलांशी भांडत होता. त्यातूनच पती पत्नींने मिळून हे कारस्थान रचले. 'वाटणी देत नाहीस काय ? थांब, आज तुला जिवंत जाळूनच मारून टाकतो' असे म्हणत मुलगा शिवाजी हजारे याने वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने पेट्रोल टाकून वडिलांना पेटवून दिले परंतु देवबा थोडक्यात बचावले गेले आहेत. वाटणीसाठी मुलाने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले असून देवबा हजारे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. 


वाटणीसाठी मुलाने आणि सुनेने एवढे महाभयानक कृत्य केले, कट रचून वडिलांना जिवंत जाळून मारण्याचे हे कारस्थान उघडे पडले त्यामुळे नात्याला मोठा हादरा बसला असून परिसरात या घटनेचा निषेध केला जात आहे. नात्याला काळिमा फासणारी ही घटना अनेकांना धक्का देवून गेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. (Attempt to burn father alive for wealth) संपत्तीसाठी मुलगा आणि सून जीवावर उठतात, अशा अनेक घटना घडलेल्याही आहेत पण जिवंत जाळून मारण्याच्या या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.  



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !