BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ नोव्हें, २०२२

भीषण अपघात, पंढरपूर येथील तीन तरुण ठार !

 


शोध न्यूज : पंढरपूर - मोहोळ मार्गावर झालेल्या भीषण अपघातात पंढरपूर येथील तीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने पंढरीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. 


रस्त्याची कामे सुरु असल्याने आजवर अनेक अपघात झाले असून रोज या अपघातात भर पडत आहे. कुणाच्या तरी चुकीमुळे निरपराध लोकांचे जीव जात आहेत. पंढरपूर- सांगोला, पंढरपूर - मंगळवेढा आणि पंढरपूर -  मोहोळ हे रस्ते तर अत्यंत धोकादायक बनलेले असताना रात्री पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर अत्यंत भीषण असा अपघात झाला आणि यात पंढरपूर येथील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर पेनूरजवळ रात्री हा अपघात झाला. या अपघातात पंढरपूर येथील विजापूर गल्लीत राहणारे हृषीकेश साखरे (वय २५) सुरज कदम (वय २८), प्रशांत शेटे (वय ४०) या तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती पंढरपूर येथे पोहोचताच अनेकांना धक्का बसला आहे. 


कार आणि खाजगी बस यांच्यात रात्री हा अपघात झाला असून आज सकाळपासून या अपघाताची माहिती पंढरपूर शहरात पसरली. (Pandharpur - Mohol road accident, three youths died in Pandharpur) एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याची ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक असून विजापूर गल्लीत प्रचंड शोक व्यक्त होऊ लागला आहे. या अपघातात मोहोळ तालुक्यातील दोघे जखमी झाले आहेत. तांबोळे येथील दत्तात्रय  श्रीमंत कोकाटे आणि कोन्हेर्री येथील दत्तात्रय बाळासाहेब देवकते अशी हे दोघे जखमी असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !