BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ नोव्हें, २०२२

कालव्यात कार कोसळून लावणी कलावतीचा मृत्यू !




शोध न्यूज : कालव्यात कार कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात लावणी कलावतीचा मृत्यू झाला असून अन्य तीन जखमी झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना काल सायंकाळी पंढरपूर तालुक्यात घडली आहे.


मोडनिंब येथून  पंढरपूरकडे निघालेली एक कार (एम एच १४ जे ई ००७७) ही भरधाव वेगात असताना पंढरपूर तालुक्यातील आष्टी गावाजवळ आली असता रस्त्यात असलेल्या एका कालव्यात कोसळली. रस्त्यावरील पुलावरून ही कार थेट या कालव्यात पडली त्यामुळे पन्नास वर्षे वयाच्या तमाशा कलावती मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. मीना देशमुख या माढा तालुक्यातील मोडनिंब येथील दत्तनगर येथे रहात होत्या. त्यांच्यासह अन्य तीन जण जखमी झाल्या आहेत. उजनी डावा कालव्यात चाळीस ते पन्नास फुट खोल असलेल्या कालव्यात ही फॉर्च्युनर गाडी  कोसळली.  ही गाडी पडताच रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी लगेच रुग्णवाहिका बोलावून घेतली. 


अपघात मृत झालेल्या मीना देशमुख यांची मुलगी ३४ वर्षे वयाच्या अंबिका आणि दहा वर्षे वयाची नात जान्हवी यांच्यासह शुभम जाधव, नारायण शिंदे हे  या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले परंतु मीना देशमुख या मात्र जागेवरच मृत झाल्या आहेत. (Death of Tamasha Kalavati due to car falling into the canal)  भरधाव वेगातील कार पंढरपूरच्या दिशेने धावत असताना कालव्याच्या पुलावर आली तेंव्हा चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट कोरड्या कालव्यात कोसळून हा अपघात झाला. 


कालव्याची खोली अधिक असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. कालव्यात खाली उतरण्यासाठी व्यवस्था नव्हती त्यामुळे खाली उतरणे कठीण झाले होते. दोरीच्या मदतीने कालव्यात उतरून जखमींना बाहेर काढण्यात आले. मीना देशमख यांचा मात्र रुगणालयात नेताना मृत्यू झाला. अंबिका अण्णा देशमुख (वय ३४),  जानवी अण्णा देशमुख (वय १०),  अण्णा देशमुख (वय ३५) अशी जखमींची नावे आहेत.



     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !