रील बनविण्याच्या मोहात तरुण तरुणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट केले जातात. हे स्टंट अत्यंत धाडसी आणि जीवघेणेच असतात. कित्येक तरुण अशा अघोरी प्रकारात जीव गमावून बसतात आणि याचे धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हे प्रसंग पाहून काळजाचा ठोका चुकतो, डोळ्यादेखत अनेकांचे जीव जाताना दिसतात तरीही असा मोह अनेकांना आवरत नाही आणि आपला जीव गमावून बसतात. असाच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून हे तरुण कशासाठी असे धाडस करतात ? असा सवाल विचारला जात आहे. मृत्यूवर शोक व्यक्त होण्यापेक्षा लोक संताप देखील व्यक्त करू लागले आहेत. नको तो स्टंट करायला गेलेल्या एका तरुणाचा अत्यंत भयावह मृत्यू झाला आहे.
केवळ स्टंट करण्यासाठी म्हणून एक तरुण अशा ठिकाणी पोहोचला आहे की ते पाहतानाही काळजाचा ठोका चुकावा ! अशा ठिकाणावरून तरुणाचा पाय निसटला तर काय होईल असा विचार मनात येत असतानाच या तरुणाचा पाय घसरतो आणि एका क्षणात तो आदळत आपटत खोल दरीत कोसळतो. उभ्या डोंगरावरून उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न हा तरुण करतो आणि त्याचे व्हिडीओ चित्रण सुरु असते. या तरुणाचा हा शेवटचा व्हिडीओ ठरतोय काय ? अशी भीती वाटू लागते आणि त्याच क्षणी तशीच घटना घडते. त्याचा पाय घसरतो तेंव्हा त्याला कशाचा आधार घेण्यासाठी आजूबाजूलाही काही नसते. आणि हा तरुण थेट दरीत कोसळतो. आजूबाजूला जे कुणी त्याचे साथीदार आहेत त्यांचा आरडाओरडा ऐकू येतो. प्रत्यक्षात त्याला कुणीही वाचवू शकत नाहीत.
केवळ स्टंट करण्यासाठी आणि त्याचा व्हिडीओ बनविण्यासाठी घडलेली ही घटना प्रत्येकाचा श्वास रोखत असली तरी अशा प्रकारचा जीवघेणा प्रकार करायचाच कशाला ? असा संताप सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसत आहे. (Horrible Stunt, Horrific Death of Young Man Viral video) अत्यंत भयावह मृत्यू या तरुणाने ओढवून घेतला असून अशा प्रकारचे अघोरी, अवाजवी स्टंट करण्याचा कुणीच प्रयत्न करू नये हेच हा व्हिडीओ दर्शवत आहे. तुम्हीही पहा हा जीवघेणा प्रकार !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !