BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑक्टो, २०२२

जाळे टाकून बसले पण शिकारीच अडकले ! सोलापूर जिल्ह्यात झाली शिकाऱ्यांचीच 'शिकार' !



शोध न्यूज : शिकार करण्याच्या हेतून जाळे टाकून शिकारीची वाट पहात बसले पण या जाळ्यात शिकार अडकण्याच्या आधी शिकारीच वनविभागाच्या सापळ्यात अडकल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. 


वन्य प्राण्यांची शिकार करण्यास कायद्याने बंदी घातली आहे तरी देखील वन विभागाची नजर चुकवत शिकार करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. अभयारण्याची निर्मिती करून वन्य प्राण्यांना कायद्याने अभय दिले आहे परंतु शिकारी आपली शिकार शोधत असतात आणि स्वत:च कायद्याची 'शिकार' बनले जातात. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात असाच प्रकार घडला आणि शिकाऱ्यांचीच 'शिकार' वनविभागाने केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे काही शिकारी तितर या वन्य पक्षांची शिकार करण्यासाठी सज्ज होते, परंतु पक्षाची शिकार होण्याआधीच वन विभागाने या शिकाऱ्यांचीच 'शिकार' केली आहे.


सोलापूर वनपरिक्षेत्रांतर्गत बेलाटी नियतक्षेत्रातील महेश मासाळ यांच्या  शेतात काही शिकारी तितर पक्षाची शिकार करण्यासाठी आले. या वन्य पक्षाला पकडण्यासाठी त्यांनी शेतात जाळे लावले आणि जाळ्यात शिकार अडकण्याची वाट पहात थांबले. त्यांच्या जाळ्यात अपेक्षित शिकार काही आली नाही पण वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मात्र या शेतात पोहोचले. काही शिकारी या क्षेत्रात शिकार करू पहात असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती त्यामुळे अधिकारी या शिकाऱ्यांचीच 'शिकार' करण्यासाठी तातडीने दाखल झाले. शिकारीसाठी लावलेले जाळे आणि शिकार अडकण्याची वाट पहात थांबलेले शिकारी या अधिकाऱ्यांना आढळून आले. वन विभागाने लगेच त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली.

 

या शिकारी मंडळींकडे जाळे, पिंजरा, तितर पक्षी असल्याचे आढळून आलेलेच होते ते सगळे साहित्य वन विभागाने आपल्या ताब्यात घेत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Four hunters were caught red-handed by the forest department) बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईच्या कुरणवाडी येथील संतोष सोपान माळी, गेवराई येथील नंदकुमार बाबुराव बर्डे,, आंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी येथील सचिन सुभाष पवार आणि सर्जेराव सोपान माळी यांना अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातून शिकारीसाठी सोलापूर जिल्ह्यात आले पण शिकाऱ्यांचीच 'शिकार'  झाल्याचा प्रकार येथे घडला आहे.      

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !