BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑक्टो, २०२२

ऊस तोडणी टोळीच्या नावाने लाखोंची फसवणूक !

 



शोध न्यूज : ऊस तोडणीसाठी टोळी देतो असे सांगून दोघांनी लाखोंची फसवणूक केल्याची आणखी एक घटना समोर आली असून याबाबत पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होण्याच्या आधी काही दिवस अशा फसवणुकीच्या घटना दरवर्षी समोर येत आहेत. ऊसाची तोड करणाऱ्या टोळ्या आधी पैसे दिल्याशिवाय घर सोडत नाहीत त्यामुळे वाहतूकदार आधीच ही तजवीज करतात. टोळीच्या मुकादमाशी करार करून ठरलेली रक्कम या मुकादामाच्या स्वाधीन केली जाते. त्यानंतर हा मुकादम ठरल्याप्रमाणे टोळी घेवून ज्या त्या कारखाना क्षेत्रात जात असतात. काहीजण मात्र केवळ फसवणूक करण्याचा उद्योग नियमितपणे करीत असताना दिसतात. करार करून रक्कम घेतात आणि ऐनवेळी बेपत्ता होतात आणि वाहतुकादाराची मोठी फसवणूक होत असते. वाहतूकदार त्यांच्या गावी जाऊन पैसे देवून टोळीला सोबत घेवून येण्याचा प्रयत्न करतात तरी देखील पैसे घेवून अर्ध्या रात्रीच मुकादम गायब होत असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. 


पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथील विलास वाघमारे यांनी अशाच फसवणुकीची तक्रार पोलिसात दिली असून पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाघमारे हे वाहतूकदार असून करकंब येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडे ते तोडणी आणि वाहतूक व्यवसाय करतात. सन २०२१-२२ साठी त्यांनी कारखान्याशी करार केला होता. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील अजय शेषराव चव्हाण आणि शेषराव नामदेव चव्हाण या टोळी मुकादमाशी वाघमारे यांचे बोलणे झाले होते. (Sugarcane cutting gang, cheating in Pandharpur taluka) दहा पुरुष आणि दहा महिला अशी वीस जणांची ऊस तोडणी टोळी देण्याचे या दोघांनी मान्य केले आणि त्यासाठी ९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मजुराच्या प्रत्यके जोडीला ९० हजार रुपये अशा दराने दहा जोड्यांचे ९ लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सदर रक्कम वाघमारे यांनी या दोघांना पोहोच केली होती.


९ लाख रुपये देवून टोळी येण्याची वाट पहात वाघमारे बसले होते परंतु प्रत्यक्षात पैसे घेवूनही ही टोळी आलीच नाही त्यामुळे वाघमारे यांची मोठी फसवणूक झाली. चव्हाण पिता पुत्रांनी भलीमोठी रक्कम घेवून टोळी न दिल्याने वाघमारे यांची मोठी फसवणूक केली होती. वारंवार मागणी करूनही घेतलेली रक्कम परत दिली जात नव्हती. सतत तगादा लावून वाघमारे यांनी १ लाख ३० हजार रुपये त्यांच्याकडून परत घेतले परंतु ७ लाख ७० हजार रुपये परत दिलेच नाहीत. 


सतत मागणी करूनही ही रक्कम दिली जात नसल्याने वाघमारे यांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीचे अनेक प्रकार पंढरपूर तालुक्यात घडल्याचे समोर येत असून यातील काही प्रकरणेच पोलिसांपर्यंत येत असतात. अशा प्रकारच्या फसवणुकीचा हा फंडा नियमित अवलंबला जात असल्याने वाहतूकदार हवालदिल झाले आहेत. (Another incident has come to light in which the duo cheated lakhs by saying that they would pay gangs for sugarcane cutting and a case has been registered in Pandharpur police.) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !