BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ ऑक्टो, २०२२

सोलापुरात देवी मिरवणुकीत पोलिसांचा सौम्य लाठीमार !

 


शोध न्यूज : दोन नवरात्र उत्सव मंडळे समोरासमोर आली आणि तणाव निर्माण होऊ लागला परंतु पोलिसांनी परिस्थिती पाहून सौम्य लाठीमार करून वेळीच पावले उचलली त्यामुळे अनर्थ टळला आहे.

 
सोलापूर शहर हे तसे संवेदनशील असून यापूर्वी शांतताभंग करणाऱ्या काही घटना घडलेल्या आहेत त्यामुळे धार्मिक उत्सवात पोलीस नेहमीच सतर्क असतात. सोलापूरला धार्मिक दंगलीची देखील पार्श्वभूमी आहे त्यामुळे उत्सवकाळात पोलीस अधिक दक्षता घेत असतात. नवरात्रीचा उत्सव शांततेत पार पडला असताना दसऱ्याच्या दिवशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. देवीच्या मिरवणुकीत दोन मंडळे एकमेकाना भिडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती पण पोलिसांनी वेळीच ही परिस्थिती हाताळली आणि पुढील अनुचित घटना टाळली. विजापूर वेस येथे ही घटना घडली. दोन मंडळे एकत्र आली त्यातून वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

 

सोलापूर शहरात विविध नवरात्र उत्सव मंडळानी मिरवणुका काढलेल्या होत्या.  देवीच्या मिरवणुकीत  ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरून दोन मंडळात वाद झाला आणि दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते परस्परात भिडले. बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळ आणि सार्वजनिक शक्ती महापूजा नवरात्र मंडळ यांच्या कार्यकर्त्यात हा वाद झाला. मिरवणूक सुरु असताना दोन मंडळातील वादात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि अखेर कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला (Mild police lathi charge in procession in Solapur) त्यामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली.   


मिरवणूक सुरु असताना बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळ विजापूर वेस येथे आल्यावर मंडळाचा ट्रॅक्टर पुढे घेण्याबाबत विजापूर वेस येथील कार्यकर्ते सूचना करीत होते पण सदर ट्रॅक्टर पुढे जात नव्हता. त्यामुळे मिरवणुका जागीच थांबून राहिल्या होत्या आणि यातूनच वादाला सुरुवात झाली. कार्यकर्ते वाद घालू लागले आणि हा वाद वाढत चालला. पोलिसांनी मात्र वेळीच यात हस्तक्षेप केला आणि त्यानंतर मात्र जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर मात्र परिस्थिती वेगाने नियंत्रणात आली. पोलिसांनी यावेळी नवरात्र उत्सव मंडळाच्या चार ते पाच जणांना ताब्यात घेतले. ही घटना वगळता शहरातील मिरवणुका शांततेत पार पडल्या. या एकाच घटनेने दसऱ्याच्या देवी मिरवणुकीला गालबोट लागले परंतु पोलिसांनी वेळीच पावले उचलल्याने परिस्थिती चिघळली नाही. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !