शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात आज एका तरुणाचा खून करण्यात आला तर दुसऱ्या एका घटनेत चार तलवारीसह एका तरुणाला गजाआड करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे एका तरुणाला चार तलवारीसह अटक करण्यात आली. बमसिंग पंचाक्षरी बमगोंडा या २७ वर्षाच्या तरुणाकडे पोलींसाना सोळा हजार रुपये किमतीच्या चार तलवारी आढळून आल्या आहेत. हा तरुण या तलवारी विक्रीसाठी घेवून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी देखील या तरुणावर गुन्हा दाखल झाला होता आणि या गुन्ह्यात त्याला जामीन मिळालेला आहे. पोलीस हवालदार अजय भोसले हे आठवडा बाजारातील अवैध व्यवसायावर करावाई करण्यासाठी निघाले असताना त्यांना हा तरुण चार तलवारी विक्रीसाठी घेवून जात असल्याने दिसून आले. जेऊर - करजगी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत त्यानुसार कारवाई केली जात असताना हा तरुण पोलिसांच्या हाती लागला आहे. पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाली आणि त्यानुसार ही कारवाई झाली. (Youth arrested with four swords) जेऊर येथे राहणारा हा तरुण चार नव्या तलवारीसह पोलिसांच्या हाती लागला असून शस्त्र अधिनियम कलम ४, २५ नुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाचा खून !
सोलापूरजवळ आज एका तरुणाच्या छातीत हत्यार खुपसून भरदिवसा खून करण्यात आल्याची थरारक घटना देखील आज घडली आहे. सोलापूरजवळ तुळजापूर रस्त्यावरील तळे हिप्परगा येथील शीख शिकलगार वस्तीत भर दिवसा एका तरुणाचा खून झाला आहे. रवीसिंग सिसपालसिंग टाक या २२ वर्षे वयाच्या तरुणाच्या छातीत हत्यार खुपसून त्याचा खून करण्यात आला. (Murder of a youth)शेजारी राहणाऱ्या एका आरोपीचे आणि रवीसिंग याचे जुने वाद होते. याच वादातून ही घटना घडली. त्याच्या छातीत हत्यार खुपसण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत रवीसिंग याचा भाऊ जगबीरसिंग टाक याने याबाबत माहिती दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !