शोध न्यूज : कारण नसताना मस्ती करायला गेला आणि 'लाथ के बदले लाथ' खावून उलटे पडावे लागल्याचा एक मस्त मजेशीर व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
काही काही लोकांना उगीच जाता जाता काही उद्योग करायची सवय असते. सहज रस्त्याने जाताना कुणी शांत बसलेल्या कुत्र्याला दगड मारते तर कुणी अन्य पद्धतीने त्याला छेडते. कधी हे कुत्रे पळून जाते तर कधी छेड काढणाऱ्याच्या मागेही लागते आणि प्रसंगी त्याचा चावाही घेत असते. आपल्या मार्गाने जाताना गपगुमान जायची सवयच नसते काही माणसाना ... उगीचच जाताजाता काही तरी करायचे आणि त्यात आनंद शोधायचा अशा वृत्तीचे काही लोक असतात. कधी ना कधी अशा लोकांना फटका देखील सहन करावा लागतो.
जसे ज्याचे कर्म तसे फळ मिळते असे म्हणतात ना ! कुणी गरीब दिसले की त्याला त्रास द्यायला जाणारी ही वृत्ती असते. साप नाग दिसला की पळ काढणारे गरीब प्राण्याला छेडताना दिसतात. गाय हा प्राणी तसा निरुपद्रवी ! अशा गरीब गाईला अकारण त्रास द्यायला गेला आणि मग या गाईने देखील त्याची औकात त्याला दाखवली. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर आवर्जून पाहिला जात आहे. "लाथ के बदले लाथ' तर खावीच लागली पण खाली पडून चांगलाच दणका देखील खाण्याची वेळ एका तरुणावर आली आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हसल्याशिवाय रहात नाहीत.
एका ठिकाणी अनेक गाई आहेत आणि त्या आपल्या कुणालाही उपद्रव देत नाहीत. त्यांना उपद्रव द्यायला मात्र एक तरुण पुढे सरसावतो. काही कारण नसताना हा तरुण भिंतीवर चढून जातो आणि भिंतीचा आधार घेत उगीचच गेला लाथ मारण्याचा प्रयत्न करतो. जशी तो गेला लाथ मारतो तसे गाय देखील त्याला प्रत्युत्तर देते. काय घडतेय हे कळायच्या आधीच हा तरुण उलटा होत भिंतीवरून खाली कोसळतो. भिंतीवरून पाठीवर पडल्यावर त्याची काय अवस्था झाली असेल याची केवळ कल्पना केली तरी पुरेशी आहे. तरुणाला त्याचा कर्माचे फळ मिळाले असल्याच्या प्रीतीक्रिया नेटकरी देवू लागले आहेत.
सोशल मीडियावरून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून काही लोक आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. कुणी या तरुणाला फालतू म्हटले आहे तर कुणी याला 'कर्माचे फळ' म्हटले आहे. (Lath ke badale laath, Viral video) गाईने दिलेल्या प्रत्युत्तराचे अनेकांनी स्वागतच केले आहे. चला तर तुम्हीही पहा हा मजेशीर आणि तरीही बरेच काही शिकवून जाणारा व्हिडीओ !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !