BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑक्टो, २०२२

आमदार शहाजीबापू वाहतूक कोंडीत अडकले आणि लोक म्हणाले ----!

 


शोध न्यूज : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली आणि भर रस्त्यावर लोकांना "काय झाडी, काय डोंगार' आठवले. रस्त्याबाबतचा संताप देखील लोकांनी या निमित्ताने व्यक्त केला.

 

गुवाहाटीच्या हॉटेलवरून आमदार शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीचे केलेले वर्णन शहाजीबापू पाटील यांना राज्यभर प्रसिद्धी देवून गेले आहे. राजकीय बंडाला तीन महिने झाले पण तरीही लोक "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ... ओक्के' हा संवाद विसरलेले नाहीत उलट जेथे संधी मिळेल तेथे या वाक्याचा पुनरुच्चार केला जातो. एका कार्यकर्त्याला फोनवरून सहज बोलताना बापूनी उच्चारलेले हे वाक्य राज्यभर गाजत राहिले आणि बापू राज्याच्या कोना कोपऱ्यात पोहोचले. कुणी गमतीने हे वाक्य म्हणू लागले आहे तर कुणी या वाक्यावरून टिंगल करतांनाही दिसत आहे. वारंवार उच्चारले गेल्यामुळे यातील मजा निघून गेली असली तरी शहाजीबापू पाटील यांच्याशी हे 'झाडी ..डोंगार' चिकटून आहेत.

 

आमदार शहाजीबापू पाटील हे आज कोल्हापूर - सांगली मार्गावरून जात असताना हातकणंगलेच्या जवळ वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत आ. शहाजीबापू यांचीही गाडी अडकली. वाहतुकीची एवढी कोंडी झाली होती की गाडी जागची हलायला तयार नव्हती. जवळपास अर्धा तास वाहने एकाच जागी अडकून राहिल्यामुळे बापूनी गाडीतच डुलकी घेतली. पण आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पाहिलं आणि मग लोकांनी काही त्यांना डुलकी घेण्याची सोय ठेवली नाही.  'काय तो सांगली - कोल्हापूर रास्ता, काय ते खड्डे, काय ते ट्रॅफिक.. एकदम ओक्के' असे लोक शहाजीबापू पाटील याना उद्देशून म्हणू लागले. या संवादातूनच त्यांनी आपला संताप देखील व्यक्त केला. 


कोल्हापूर सांगली मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे त्यामुळे वाहनधारक वैतागून गेले आहेत. याच रस्त्यावरून शहाजीबापू सांगलीकडून कोल्हापूरकडे निघालेले होते. हातकणंगले बस स्थानकाच्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती आणि याच कोंडीत शहाजीबापू अडकले होते. बापुना पाहून लोकांनी त्यांच्या गाडीजवळ गर्दी केली. (MLA Shahajibapu Patil's car in traffic jam) बापूंच्या सुरक्षारक्षकांनी कशीबशी त्यांची गाडी गर्दीतून बाहेर काढली. यावेळी पोलिसांचीही चांगलीच धावपळ उडाली. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !