BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑक्टो, २०२२

पंढरपूर - उमदी मार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू !

 


शोध न्यूज : पंढरपूर - उमदी मार्गावर दोन दुचाकीत झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून यातील एक तरुण मंगळवेढा तालुक्यातील आहे तर दुसरा जत तालुक्यातील आहे. 


जत तालुक्यातील उमदी येथून दोन किमी अंतरावर असलेल्या उमदी - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकी वाहनात समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिवनगी येथील भीमराव मायाप्पा पडवळे आणि जत तालुक्यातील उटगी येथील इराप्पा तमाराया बिराजदार या दोघांचा मृत्यू झाला आहे. पडवळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जबर जखमी झालेल्या बिराजदार याला सांगलीकडे उपचारासाठी नेण्यात येत होते परंतु कवठे महांकाळजवळ पोहोचल्यावर त्याने देखील अखेरचा श्वास घेतला आहे. 


मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी येथील भीमराव पडवळे हे आपल्या दुचाकीवरून उमदी - पंढरपूर मार्गावरून शेवाळे वस्तीकडे जात होते तर बिराजदार हा दुसऱ्या एका दुचाकीवरून मंगळवेढ्याच्या दिशने निघाला होता. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि यात भीमराव पडवळे यांचा मृत्यू जागेवरच झाला. त्यांना उपचारासाठी म्हणून जत येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहित डॉक्टरानी दिली. इराप्पा बिराजदार हा मात्र गंभीर स्वरुपात जखमी झाला होता परंतु रुग्णालयाच्या वाटेवरच त्याचाही मृत्यू झाला. (Two died in an accident on Pandharpur-Umdi road) उमदी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !