BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ ऑक्टो, २०२२

माजी आमदार म्हणतात, "मला आता हातात बाटली आणि ग्लास ---"




शोध न्यूज : आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी स्पर्धा करायची असेल तर मला हातात बाटली आणि ग्लास घ्यावा लागेल असे मिश्लिक पत्युत्तर माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आमदार राऊत यांना दिले असून ही जुगलबंदी अशीच गाजत राहणार असल्याचे दिसत आहे.


सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार आणि बार्शीचेच माजी आमदार दिलीप सोपल यांच्यातील शब्दयुद्ध आता जिल्ह्याच्या चांगलेच परिचयाचे झाले आहे. दोन्ही बाजूनी अस्सल शब्दांचा वापर करून टीकाटिपण्णी सुरु असते, त्यात माजी मंत्री राहिलेले दिलीप सोपल यांचं वक्तृत्व मोठमोठ्या सभातूनही हशा आणि टाळ्याचा पाऊस पाडत असते. अत्यंत मिश्कील आणि हसत हसत टोले लगावण्याची सोपल यांची खासियत केवळ सोलापूर जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला माहित आहे. भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांच्यात अलीकडे हे शब्दयुद्ध अधिकच जोराने सुरु झाल्याचे दिसत असून आता ते टोकाला जाऊ लागले की काय ? असा प्रश्न निर्माण व्हावा इथपर्यंत हा विषय पोहोचला असल्याचे दिसत आहे.


आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांना खुले आव्हान दिले आणि मग दिलीप सोपल यांनी ही संधी न सोडता खास आपल्या शैलीत मोजक्याच शब्दात पण अत्यंत झोंबणारे प्रत्युत्तर दिले आहे. साहजिकच यामुळे जिल्ह्यात हा शब्दयुद्धाची चर्चा देखील सुरु झाली आहे. "दिलीप सोपल, तुमच्यात दम असेल तर राऊताबरोबर खेळ खेळा, तेंव्हा तुम्हाला खरा मर्द म्हणतो, नाहीतर तुम्ही कोण आहात हे सगळ्या बार्शीला माहित आहे' अशा भाषेत आमदार राऊत यांनी सोपलाना आव्हान दिले होते. तुमच्यात धाडस असेल तर आमच्या घराण्यांसोबत स्पर्धा करून दाखवा, तुमच्या निष्क्रीयतेमुळे व्यापारी आणि २६ डाळमिलचे नुकसान झाले आहे असा आरोपही आमदार राऊत यांनी गेल्याच आठवड्यात केला होता.


अशा प्रकारचे आरोप आणि थेट खुले आव्हान दिल्यावर दिलीप सोपल हे गप्प राहणारे नेते नक्कीच नाहीत, त्यामुळे बार्शीच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात सोपल यांच्या प्रत्युत्तराची पर्तीक्षा होती आणि त्यांनी आता खास सोपल स्टाईल ने खुमासदार पद्धतीने उत्तर दिले आहे. याचीही चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. 'आमदार राऊत यांच्याशी स्पर्धा करायची असेल तर मला दारू अड्डा, मटका, जुगार धंदा यापासून सुरुवात करावी लागेल' अशा शब्दात सोपल यांनी टोला लगावला आहे. "अदानी, अंबानी, टाटा बिर्ला यांना आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यावसायिक स्पर्धा चॅलेंज द्यावे, लोकांच्या सेवेत बारा आणे आयुष्य घालवलेला मी माणूस आहे.. मी आमदार राऊत यांच्यासोबत व्यावसायिक स्पर्धा करायची म्हंटलं तर मला एका हातात बाटली आणि दुसऱ्या हातात ग्लास घ्यावा लागेल. मटका, जुगार या व्यवसायाने सुरुवात करावी लागेल" असा सणसणीत टोला दिलीप सोपल यांनी आमदार राजेंद्र राऊत यांनी लगावला आहे. 


आमदार राऊत आणि माजी आमदार दिलीप सोपल यांच्यात पुन्हा शब्दांच्या ठिणग्या उडू लागल्याने जिल्ह्याचे लक्ष या टीका टिपण्णीकडे लागले असून दोघेही आरपार संघर्षाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. (Dispute between MLA Rajendra Raut and Dilip Sopal) त्यांच्या परस्परांवरील टीकेकडे आता सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष असून त्यांच्या विधानांची चर्चा देखील होऊ लागली आहे. 


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !