BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० ऑक्टो, २०२२

लग्नाची थाप देवून तरुणीला घातला लाखोंना गंडा !

 


शोध न्यूज : लग्न करतो असे सांगून संगणक अभियंता असेलेल्या एका तरुणाला तब्बल २८ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून सोलापूर पोलीस आता या लबाड लांडग्याच्या शोधात आहेत.


अलीकडे लग्न हा विषय देखील फसवणुकीचा ठरू लागला असून नकली नवरी उभी करून लग्न लावले जाते आणि लग्न होताच ही नवरी दागिन्यासह पळून जाते. अशा प्रकारचे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. पैसे लाटण्याचे नवनवे प्रकार शोधून काढून 'लबाड लांडगे' फसवणूक करीत असताना रोजच समोर येत आहे. ऑनलाईन फसवणुकीचे तर अमर्याद प्रकार सुरु आहेतच पण एका संकेतस्थळाच्या माध्यमाचा वापर करून एक मोठी फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. (Online Crime) सोशल मीडियावरून ओळख वाढवून फसवणूक होण्याच्या अनेक घटना घडत असल्या तरी सोलापूरच्या एका संगणक अभियंता असलेल्या तरुणीची २८ लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. 


विवाह जुळविणारी अनेक संकेतस्थळे आहेत. विवाह इच्छुक अनेक तरुण तरुणी आपला बायोडाटा अशा संकेतस्थळावर देत असतात. सोलापूर येथील एका संगणक अभियंता असलेल्या ३१ वर्षे वयाच्या तरुणीने देखील आपला बायोडाटा जीवनासाठी डॉट कॉम या संकेतस्थळावर दिला होता. त्यामुईल दावणगिरी येथील जनार्दन नावाच्या एका तरुणाने या तरुणीशी संपर्क केला आणि 'आपली मोठी कंपनी आहे' असे सांगत लग्न करण्याचे मान्य केले. प्रत्यक्षात हा लबाड लांडगाच होता परंतु या तरुणीच्या हे लक्षात आले नाही आणि ती फसतच गेली. कंपनीचा मालक असल्याचे त्याने सांगितले आणि या तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला. तिच्या विश्वासाचा गैरफायदा उठवत तरुणीचे बँक खाते मात्र त्याने रिकामे केले.


  • आपली सॉफ्टवेअर कंपनी आहे, जगभरात आपला व्यवहार चालतो अशी बतावणी करून या लांडग्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. आपण खूप मोठे आहोत असे तो भासवत राहिला आणि तरुणी पुन्हा पुन्हा फसत गेली, तो फसवतच राहिला आणि --- 


सुरुवातीला काही कारणे सांगून या लांडग्याने तरुणीकडून काही पैसे घेतले. पुन्हा त्याने "आपले पैसे परदेशात अडकले आहेत त्यामुळे कंपनीच्या कामगारांचे पगार करणे थांबले आहे, आपण काही मदत केली तर माझी ही अडचण दूर होईल" अशी बतावणी केली. सदर तरुणीही त्याला रक्कम द्यायला तयार झाली. गुगल पे तसेच बँकेत रक्कम भरण्यास त्याने सांगितले आणि या तरुणीनेही टप्प्याटप्प्याने तब्बल २८ लाख ८ हजाराची रक्कम त्याला पाठवली. नंतर या तरुणीने लग्नाबाबत विचारला केली असता या लांडग्याने वडिलांना मारण्याची धमकी दिली. तरुणीकडून मोठी रक्कम घेतली पण प्रत्यक्षात लग्न केलेच नाही तेंव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले आणि तिने पोलीस ठाणे गाठले. 


१५ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडलेल्या या घटनेबाबत तरुणीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर संबधित 'लांडग्या' विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनार्दन बसवा रेड्डी याच्यासह तिघांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस या भामट्याच्या शोधात आहेत. (Financial fraud of a young woman by pretending to marry) पोलिसांच्या हाती आरोपीची माहिती आली असून पोलिसांचे पथक आता दावणगिरीला जाऊन त्याचा शोध घेणार आहेत. 



( It has been revealed that a young computer engineer, who was a computer engineer, cheated about 28 lakhs by saying that he is getting married and the Solapur police are now looking for this lying wolf.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !