BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ सप्टें, २०२२

झुकेगा नही ! शरद पवार यांची आक्रमक ललकारी !

 



शोध न्यूज : 'दिल्लीसमोर झुकणार नाही' अशी गर्जना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केली असून मोदी सरकार विरोधात लढण्यास सिद्ध होण्याचे आवाहन केले आहे. 


दिल्लीतील मोदी सरकारच्या विरुद्ध विरोधकांची एकजूट करण्याचा विषय मागील काही काळापासून चर्चेत आहे. विरोधकांनी एकत्र येवून देशभरात भाजपाला टक्कर देण्याचा मनोदय अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेला आहे. आज मात्र नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मेळाव्यात बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गर्जना करून मोदी सरकारला ललकारले आहे. त्यामुळे विरोधकांत एकजूट होण्यात देशात एक वेगळे बळ मिळणार आहे. शरद पवार यांच्यावर देखील ईडी प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला होता पण शरद पवार आजिबात झुकले नाहीत आणि त्यातून राज्यात राष्ट्रवादी प्रबळ झाली होती. आता पुन्हा शरद पवार यांनी न झुकाण्याचे आवाहन केले आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातूनच आम्हाला प्रेरणा मिळते, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेले आहे, दिल्लीसमोर झुकणार नाही ! असे म्हणत शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार प्रहर केले आहेत. (Sharad Pawar is aggressive against the central government)     आपल्या देशात छपन्न टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत, आमच्या शेतकऱ्यांचा आम्हाला गर्व आहे. या देशाला शेतकऱ्यांचा गौरव आहे. शेतकरी देशाच्या अन्नाची गरज पूर्ण करतो त्या शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्रित लढण्याची गरज आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे असे पवार यांनी सांगितले.

 

अल्पसंख्यांक शेतकऱ्याबाबत देशभरात विरोधाचे वातावरण निर्माण केले जात असतानाच कृषी कायद्यावर संसदेत चर्चा केली गेली नाही, राष्ट्रवादी हा शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहणारा पक्ष असून शेतकरी अडचणीत येईल त्या प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरेल असे सांगतानाच पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील निशाना साधला. महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून करायच्या आणि आपल्याच गुजरातमध्ये बिल्किस बानू हिच्यावर अत्याचार करून, तिच्या कुटुंबातील लोकांची हत्या करणाऱ्या लोकांची शिक्षा माफ करण्याचे काम गुजरात सरकारने केले आहे.  देशात महागाई वाढलेली असताना भाजप न एते मात्र भारताची अर्थव्यवस्था देशात पाचव्या क्रमांकावर असल्याचा दावा करतात अशा अनेक मुद्द्यांवर शरद पवार यांनी भाष्य केले.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !