BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ सप्टें, २०२२

शिंदे गटातील आमदारांवर गोळीबाराचा आरोप !

 



शोध न्यूज : शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील संघर्ष आता अधिक वाढू लागला असून शिंदे गटाकडून  शिवसेनेवर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी आपला एक गट स्थापन केला आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे चाळीस आमदार गेले. भाजपशी जवळीक करून शिंदे गटाने सरकार स्थापन केले परंतु शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मोठा संघर्ष सुरूच आहे. सतत धुसफूस, टीका अशा गोष्टी सुरूच आहेत शिवाय राजकीय खेळ्या देखील खेळल्या जात आहेत. परंतु हा संघर्ष आता टोकाला जात असल्याचे दिसू लागले आहे. शिवसेना कुणाची ? हा कळीचा मुद्दा अजून न्यायालयात प्रलंबित आहे पण रस्त्यावर मात्र राडे पाहायला मिळू लागले आहेत. 

मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला आहे. या दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस ठाण्याच्या परिसरात हे दोन्ही गट समोरासमोर आले होते तेंव्हा शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गोळीबारात शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत हे थोडक्यात बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे तर हे आरोप आमदार सरवणकर यांनी नाकारले आहेत. दोन्ही गटातील या राड्यामुळे संघर्ष अधिक भडकत चालल्याचे दिसत आहेच शिवाय या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जानासाठी शिवसेनेकडून गणेश भक्तांच्या स्वागतासाठी मंच उभा करण्यात आला होता. याच मंचाशेजारी शिंदे गटाने देखील त्यांचा मंच उभा केला होता. मंचावरून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेला डिवचले होते. त्यांच्या म्यांव म्यांव करण्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झली होती आणि दोन्ही गट आपसात भिडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. (Allegation of firing on Shiv Sena by MLA from Shinde group) पोलिसांनी यात हस्तक्षेप केला तेंव्हा वरून तरी हा वाद शांत झाल्याचे दिसले होते. या वादाचे पडसाद पुन्हा उमटताना दिसून आले आहेत. 

या प्रकरणाबाबत शिंदे गटातील संतोष तेलावणे यांनी फेसबुकवर आणि व्हाटस एप वर पोलीस लिहून अपशब्दांचा वापर केला होता. त्यातून पुन्हा शिवसैनिक भडकले आणि तेलावणे यांना मारहाण केली. त्यानंतर समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कल येथे राडा केला. आणि आता पुन्हा मध्यरात्री दोन्ही गटात मोठा राडा झाला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला.  या घटनेनंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांची चौकशी सुरु केली आणि चौकशीनंतर आ. सरवणकर हे पहाटे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. हा एका घरगुती प्रकरणाचा वाद होता असे त्यांनी पोलीस ठाण्यातून परत जाताना सांगितले.  

शिवसेनेवर गुन्हा !
दरम्यान संतोष तेलावणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पंचवीस शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे, यात विभागप्रमुख महेश सावंत संजय भगत, शैलेश माळी यांचाही समावेश आहे. या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष कुठल्या ठरला पोहोचू लागला आहे याचेच दर्शन घडू लागले आहे. 

सत्तेचा माज आलाय !
शिंदे गटातील लोकांना सत्तेचा माज आला आहे आणि हे किती उन्मत्त झाले आहेत हे दोन दिवसात अधिक पाहायला मिळाले आहे. शिवसैनिक म्हणून आम्ही सहन तरी किती करायचं ? शिवसेनेचे विभागप्रमुख महेश शिंदे यांना गोळीबारातून टार्गेट करण्याचा हा प्रयत्न केला गेला आहे असा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे.    

   अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !