BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ सप्टें, २०२२

सात जण वाहून जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल !

 


शोध न्यूज : पुलावरून पुराचे पाणी वहात असताना पूल ओलांडण्याचे धाडस करणारे सात जण वाहून जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल होत असून हा प्रसंग पाहताना कुणाच्याही काळजाचा ठोका चुकाल्याशिवाय रहात नाही. 


पुलावरून पुराचे पाणी वाहात असताना त्यातून पलीकडे जाण्याचे धाडस करणे बहुतेकवेळा जीवावर बेतत असते. पावसाळ्याच्या दिवसात अशा अनेक घटना घडतात. पुलावरून पुराचे पाणी वहात असताना वाहने घालण्याचे धाडस देखील अनेकदा करण्यात येते आणि डोळ्यादेखत ही छोटी आणि मोठीही वाहने पुरात वाहून जातात. या घटनेचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत असतात. पायी चालत पूल ओलांडणे हे तर प्रचंड धोक्याचे आणि जीवावर बेतणारे असते तरी देखील अशा प्रकारचे धाडस केले जाते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे देखील अशीच एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता राज्यभर पहिला जात आहे. पुराच्या पाण्यात सात जण नेमके कसे वाहून गेले हे या व्हिडीओमुळे अनुभवता येत आहे.

 
बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथील एका ओढ्यावरील ही घटना असून ती काळजाचा ठोका चुकविणारी आहे. ओढ्याला पूर आलेला असून पुराच्या पाण्याला वेग आहे. पुराचे हे पाणी पुलावरून वहात असताना देखील काही जण पूल ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते. एकमेकांचा हात धरून अर्धा पूल ओलांडला गेला पण त्यानंतर मात्र जे घडले ते मात्र थरारक आहे. एकमेकांच्या आधाराने हे सर्व पुलावरून निघाले होते परंतु त्यातील एकाचा तोल गेला आणि त्यामुळे सगळ्यांचाच तोल ढळला. एकेक करून खाली पडू लागले आणि पुराच्या पाण्याबरोबर वाहून जाऊ लागले. यात दोन महिलांचाही समावेश आहे.  खाली पडताच पुराच्या पाण्याबरोबर ते वाहात जाऊ लागले. एकेक करीत सगळेच या पुरात वाहून जाताना या व्हिडीओत दिसत आहे. 


पुरात वाहून गेलेल्यात पप्पू क्षीरसागर, पप्पू कुंभार, दिलीप ताकभाते, अनिता ताकभाते, पोपट घाडगे, अनुसया घाडगे व निखील कुंभार यांचा समावेश होता. ओढ्याच्या पलीकडेच थांबलेल्या काही तरुणांनी उद्या मारल्या आणि या सातही ग्रामस्थांचे प्राण वाचविले आहेत. हा पूल वर्षातील सहा महिने पाण्याखाली असतो आणि दळणवळणाची गैरसोय होते. मागणी करूनही पुलाची उंची वाढवली जात नसल्याने अशा घटना घडत असल्याचे गावकरी  सांगत आहेत. आता तरी या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. (
The video of seven people being swept away went viral) या थरारक घटनेचा व्हिडीओ पहा ( व्हिडीओ पाहण्यासाठी खालील ओळीवर टच करा !) 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !