BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ सप्टें, २०२२

साहेब, मी बायको पोरांचा खून केलाय...! खुनी पोलीस ठाण्यात हजर !





शोध न्यूज : 'साहेब, मी माझ्या बायकोचा आणि दोन पोरांचा खून केलाय, मला आत घ्या'! म्हणत एक नराधम थेट पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याची कबुली ऐकून पोलीस देखील हादरून गेले !


खुनासारखे गंभीर गुन्हे करून आरोपी पोलिसापासून दूर पळून जातात, त्याला पकडण्यासाठी पोलिसांना वणवण करावी लागते पण काही निर्ढावलेले खुनी निर्लज्जपणे पोलीस ठाण्यात येवून स्वत:च आपल्या गुन्ह्याची कबुली देतात. अशा घटना क्वचित घडत असल्या तरी पण त्या घडतात. अशा वेळी सुरुवातीला पोलीसाचा विश्वास पटकन बसत नाही पण नंतर मात्र सगळे सत्य पोलिसांच्या समोर येत असते. कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशीच एक थरारक घटना घडली असून सुरुवातीला पोलीस चक्रावले आणि त्याचा गुन्हा ऐकून हादरले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील एक नराधम असाच कागल पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि 'साहेब, मी बायको आणि दोन पोरांना संपवलेय, मला आत घ्या' असे म्हणत निर्विकारपणे पोलिसांच्या समोर उभा राहिला. 


कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य शहर असलेल्या कागल येथे ही थरारक घटना घडली आहे. नराधम बापाने आपल्या पत्नीसह दोन मुलांचा जीव घेतला आणि तिहेरी हत्याकांड करून थेट पोलिसांच्या समोर अगदी निर्विकार चेहरा करून उभा राहिला. प्रकाश बाळासाहेब माळी असे या ३६ वर्षीय नराधमाचे नाव आहे. हा प्रकाश माळी कागल शहरात पूर्वी होमगार्ड म्हणून काम करीत होता. ही नोकरी सोडून आता तो एका साखर कारखान्यात काम करीत आहे. कागल शहरात तो पूर्वी कोष्टी गल्लीत रहात होता परंतु तेथून तो गणेशनगर भागात राहायला आला आहे. प्रकाश माळी याचा आपली पत्नी गायत्री प्रकाश माळी हिच्यासोबत वाद झाला. या भांडणात त्याने गायत्रीचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह घरातच आतल्या खोलीत लपवून ठेवला. पत्नीचा जीव घेवून देखील तो अत्यंत निर्विकारपणे बाहेरच्या खोलीत बसून राहिला. काही घडलेच नाही असा त्याचा अविर्भाव होता.


प्रकाशचा मुलगा कृष्णा हा शाळेतून घरी आला तेंव्हा त्याला आई दिसत नव्हती, आईचा शोध घेत घेत तो आतल्या खोलीत गेला तर आई जमिनीवर पडलेली असल्याचे त्याला दिसले. त्याने आईला हाक मारत तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण आई जागची हलत नव्हती. आपल्या वडिलानेच आईला काहीतरी केले आहे याची जाणीव त्याला झाली आणि तो मोठ्याने रडू लागला. कृष्णा मोठ्याने रडू लागल्यामुळे प्रकाश अधिकच संतापला आणि त्याने थेट आपल्या मुलाचा, दहा वर्षे वयाच्या कृष्णाचाही गळा आवळून त्याचाही खून केला. एका पाठोपाठ दोन खून करून प्रकाश निर्विकार होता. कृष्णाचाही मृतदेह त्याने त्याच खोलीत ठेवला आणि शांतपणे बाहेरच्या खोलीत जाऊन बसला. एका घरात दोघांचे जीव त्याने घेतले होते पण त्याच्या चेहऱ्यावर काहीही दिसत नव्हते. 


सोळा वर्षाची त्याची मुलगी आदिती ही सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घरी आली. आई आणि आपला भाऊ यांचे मृतदेह पाहून तिने हंबरडा फोडला. तिच्या मोठ्याने रडण्याच्या आवाजाने पुन्हा प्रकाश संतापला. सुरुवातीला त्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती शांत बसत नाही हे पाहून त्याच्या डोक्यातला सैतान पुन्हा जागा झाला. आदितीचाही गळा त्याने आवळला आणि तिचा खून करू लागला. यावेळी त्याच्या हातातून ती निसटली, हिसडा मारून ती बाजूला गेली पण प्रकाश माळी याने तिचा पिच्छा सोडला नाही. नराधमाने स्वयंपाकघरातील वरवंटा आणला आणि जोराने तिच्या डोक्यात घातला. (Triple massacre in Kolhapur)या प्रहाराने ती खाली कोसळली, रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि जागीच गतप्राण झाली. एका घरात घरातल्याच नराधमाने आपली बायको आणि दोन मुले यांचा जीव घेतला होता. 


बायको, दोन मुलांचे मृतदेह घरात पडून होते. पुढे काहीतरी करणे गरजेचे होते त्यामुळे तो सरळ आपल्या भावाच्या घरी गेला. आपण बायको आणि दोन्ही मुलांना मारून टाकले आहे असे त्याने आपल्या भावाला सांगितले पण भावाचा त्यावर आजीबात विश्वास बसला नाही. भाऊ काहीतरी मस्करी करतोय असे वाटल्याने त्यांनी त्याला हाकलून लावले. प्रकाश माळी हा भावाच्या घरून थेट कागल पोलीस ठाण्यात पोहोचला. (Murder of wife, two children, Accused in police station)  पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी होती आणि रात्र झालेली होती. पोलिसांनी बाहेरचे गेट बंद केलेले होते. गेटवर जाऊन त्याने गेट उघडण्यास सांगितले. पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले तेंव्हा तो म्हणाला, :साहेब, दार उघडा आणि मला आत घ्या,  मी माझ्या बायकोचा आणि दोन पोरांचा खून केलाय' !


प्रकाश तीन खून करून आल्याचे सांगत होता पण पोलिसांना त्याच्यावर विश्वास बसला नाही. शेवटी पोलिसांनी त्याला आत घेतले आणि तो काय सांगतोय हे ऐकून घेतले. त्याच्याकडून अधिक माहिती घेवून पोलीस त्याच्या घरी पोहोचले. तेथील चित्र पाहून पोलीसानाही हादरा बसला. (A triple murder) त्याच्या घरात तीन मृतदेह पडलेले होते. या घटनेची माहिती बाहेर वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेला. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या तिहेरी हत्याकांडामुळे प्रत्येकजण हादरून गेला आहे. अनैतिक संबंधाच्या करणातून ही घटना घडली असल्याचे समजते.  


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !