शोध न्यूज : पंढरपूर येथील उप कारागृहात असलेल्या एका आरोपीचा मृत्यू झाला असून तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता.
एक गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला, सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे येथील संशयित आरोपी संतोष सुर्यकांत गडहिरे (वय ४५) याचा आजारी असल्यामुळे मृत्यू झाला आहे. संतोष गडहिरे याला एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती आणि त्याला पंढरपूर येथील उप कारागृहात ठेवण्यात आले होते. उप कारागृहात असताना तो आजारी पडला होता. त्याची प्रकृती बिघडली असल्यामुळे त्याला २३ सप्टेंबर रोजी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उप कारागृह अधीक्षक यांच्या आदेशाने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले होते. सोलापूर येथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्युनंतर प्रशासनाने नियमानुसार पुढील कार्यवाही केली आहे.
मयत संतोष गडहिरे हा मूळचा सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे येथील असून त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला उप कारागृहात ठेवण्यात आले होते. दुचाकीच्या चोरी प्रकरणी सांगोला पोलिसांनीही त्याला अटक केली होती. सांगोला, पंढरपूर, मोहोळ परिसरातील दुचाकी चोरी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याच्याकडून चोरीची काही वाहने देखील हस्तगत करण्यात आली होती. दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्याने पोलिसांनी अशा चोरांचा शोध सुरु केला होता त्यावेळी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्या आधारे सापळा लावून पोलिसांनी संतोष गडहिरे याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील एम एच १२ ए एकस ३०४३ या रिक्षाच्या कागदपत्रांची विचारणा केली तेंव्हा कागदपत्र नसल्याची आणि सदर रिक्षा चोरलेली असल्याची कबुली त्याने दिली होती. (Death of suspected accused in Pandharpur Sub Jail) त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पंढरपूर, सांगोला परिसरातील दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले होते आणि नंतर त्याच्याकडून तीन रिक्षा, एक होंडा शाईन, एच एफ डिलक्स कंपनीच्या दोन दुचाकी आदी वाहने पोलिसांनी जप्त केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !