BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ सप्टें, २०२२

अपहरणाचा बनाव करून दीड वर्षाच्या मुलीची हत्या !

 





शोध न्यूज : मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेचा फायदा उठवत एका पित्याने आपल्याच दीड वर्षाच्या मुलीला शेततळ्यात फेकून मारून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुले पळविणारी टोळी असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. ठिकठिकाणी पोलिसांनी या अफवा असल्याचे सांगितले असले तरी पालकांत या नसलेल्या टोळीची दहशत आहे आणि  अनेक पालकांनी आपली मुले शाळेत पाठविणे बंद केले आहे. सोशल मीडियावरून या अफवांचे पिक जोरात येत आहे त्यामुळे ही भीती अधिकच गडद होत आहे. या अफवेचा फायदा घेवून एका नराधम पित्याने आपल्याच दीड वर्षाच्या मुलीला शेततळ्यात फेकून दिले आणि मुले पळविणाऱ्या टोळीने आपली मुलगी पळवली असल्याचा बनाव केला. (Killing a little girl by faking kidnapping) अखेर हा बनव उघडकीस आला. पत्नी चारचौघात बोलली म्हणून त्याचा राग त्याने या मुलीवर काढला आणि यात त्या बालिकेचा मृत्यू देखील झाला. 


पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आणि जालना - निधोना रस्त्यावरील एका शाळेचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासून पहिले. पुन्हा पुन्हा हे फुटेज पहिले तरी देखील यात काहीच संशयास्पद आढळून आले नाही. त्यानंतर मात्र पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली आणि आपला तपास जगन्नाथ याच्याकडे वळवला. पोलिसांनी त्याची कौशल्याने उलटतपासणी घेतली आणि यात तो बरोबर फसला. अखेर त्याने आपणच श्रावणीचा खून केला असल्याची कबुली पोलिसांना दिली. मुले पळवणाऱ्या टोळीने आपली मुलगी पळवली असल्याचा बनाव या पित्याने केला होता आणि याची चर्चा परिसरात पसरली. या चर्चेमुळे परिसरातील नागरिकांत आणखीच घबराट निर्माण झाली आणि मुले पळविणारी टोळी अस्तित्वात असल्याचा समज अनेकांचा झाला. पोलिसांना मात्र जगन्नाथ याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. (The father committed the murder of the little girl by pretending to be abducted


सिल्लोड तालुक्यातील गव्हाण येथील जगन्नाथ डकले हा निधोना शिवारातील शिवाजी पवार यांच्या शेतात तीन महिन्यांपासून सालगडी म्हणून काम करतो. त्याची पत्नी प्रियंका, पाच वर्षे वयाचा मुलगा आणि दीड वर्षे वयाची श्रावणी नावाची एक मुलगी असे मिळून हे कुटुंब शेतातच राहते. त्यांची दीड वर्षांची मुलगी श्रावणी अचानक बेपत्ता झाली आणि जगन्नाथ याने आपल्या मुलीला टोळीने पळवले असा आभास निर्माण केला. शेताचं गेटवर निळ्या रंगाची एक गाडी दोन दिवसापासून येत होती आणि तेथे थांबत होती. या गाडीतल्या लोकांनीच आपल्या मुलेचे अपहरण केले असेल असे तो पोलिसांना सांगत राहिला. मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवा सगळीकडेच आहेत परंतु खरोखरच अशी टोळी या परिसरात आहे काय ? असा प्रश्न त्याच्या सांगण्यामुळे पडू लागला.


दीड वर्षांची मुलगी श्रावणी ही झोपलेली असताना तिला त्याने घरासमोर बांधलेल्या झोळीत आणून झोपवले. त्यानंतर तो परत शेतात गेला, शेतात काही महिला काम करीत होत्या. श्रावणी एकटीच असल्यामुळे जगन्नाथ याची पत्नी प्रियांका त्याला या महिलांच्या समक्ष अपमानास्पद बोलली. जगन्नाथ याला आपला चारचौघात अपमान झाल्याचा राग आला होता. या रागातच तो परत शेतातील घराकडे आला आणि झोपेतल्या श्रावणीला उचलून त्याने जवळच्या शेततळ्यात फेकून दिले. त्यानंतर मात्र त्याने आपल्या मुलीला मुले पळविणाऱ्या टोळीने पळवून नेल्याचा बनाव रचला आणि त्याप्रमाणे पोलिसांची देखील दिशाभूल करण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनीच त्याचे बिंग फोडले आणि नराधम पित्याला बेड्या ठोकल्या ! 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !