BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ सप्टें, २०२२

रिकाम्या गाडीचे पन्नास, भरलेल्या गाडीचे शंभर दे !





शोध न्यूज : वाहतूक पोलिसाच्या हप्तेगीरीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असून पोलिसांची दुसरी बाजू यामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे.


पोलीस विभागावर प्रचंड कामाचे दडपण असते, पोलिसांची संख्या कमी आणि गुन्हेगार अधिक अशा परिस्थितीत पोलिसांना खूप परिश्रम करावे लागतात. त्यांच्या कुटुंबाची देखील मोठी हेळसांड होत असते. पोलिसांच्या परिश्रमामुळे सामान्य जनता सुरक्षित असते त्यामुळे पोलिसांचे खूप उपकार जनतेवर असतात. कोरोनाच्या कालावधीत तर पोलिसांनी घरदार सोडून रस्त्यावर दिवसरात्र काम केले होते. या काळात अनेक पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्याबाबत जनतेच्या मनात कायम सहानुभूती आणि आस्था असते परंतु दुसरी बाजू समोर आली की पोलिसांची प्रतिमा मलीन होत असते. काही पोलीस लाचखोरीत अडकतात तर काही हप्तेगिरीमुळे अडचणीत येत असतात. घाम घालून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन यामुळे बदलू शकतो. असाच हप्तेगिरीचा एक व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


वाहतूक पोलिसांकडून (
Traffic Police) लुबाडणूक करण्याचे कित्येक प्रकार यापूर्वीच उघड झाले आहेत आणि त्यांच्यावर करावाई देखील झालेली आहे. तरी देखील काही वाहतूक पोलीस अशा गैर कृत्यापासून दूर जात नाहीत आणि कुठे तरी अडकून बसतात. वाहने अडवून कारवाई करण्याची धमकी देत काही रक्कम उकळतात, पैसे दिले की वाहन सोडून देतात आणि नाही दिले की त्याच्यावर मोठ्या दंडाची कारवाई केली जाते. अशाच एका पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका वाहनचालकाचा हा अनुभव व्हिडीओतून दिसत आहे. उस्मानाबाद - लातूर मार्गावर एक वाहतूक पोलीस वाहन चालकाला हप्ता मागताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. 


बार्शी तालुक्यातील अस्लम जानूर शेख हा आपल्या वाहनातून शेळ्या घेऊन लातूरकडे निघालेला असताना उस्मानाबाद- लातूर रस्त्यावर त्याला वाहतूक पोलिसांनी रोखले आणि त्याच्याकडे पैशाची मागणी केली. 'खटला दाखल केला तर चार हजार रुपयांचा दंड होईल, प्रत्येक शेळीच्या मागे दहा रुपयांप्रमाणे पैसे दे' अशी मागणी या पोलिसाने केली आहे. (Viral video of police abduction, 
Osmanabad on Latur boundary ) एवढ्यावरच हा विषय थांबला नाही तर चालकाने "नेहमीची गाडी असून सहकार्य करा' असे म्हटल्यानंतर पोलिसाने त्याचा दरच सांगून टाकला आहे. 


येथून पुढे रिकामी गाडी घेऊन चालला तरी पन्नास रुपये आणि भरलेली गाडी असेल तर शंबर रुपये द्यावे लागतील, अजून काय सहकार्य करायला हवे?' असा सवाल करीत त्याने उपकाराची भाषा केली. वाहनचालकाने मात्र हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आणि व्हायरल देखील केला आहे. त्यामुळे आता या पोलिसांवर काय कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !