BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ सप्टें, २०२२

चौकशीच्या धसक्याने वन कर्मचाऱ्याची आत्महत्या !






शोध न्यूज : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केवळ चौकशीसाठी बोलाविले पण चौकशीच्या धसक्याने एका वन कर्मचाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.


अलीकडे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकत आहेत. लाच मागण्याचे आणि देण्याचे प्रकार आधीपासूनच सुरु असले तरी नागरिकात जागरुकता आल्यामुळे लोकसेवकाने लाचेची मागणी केली की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला जात आहे. या विभागाकडे तक्रार गेली की ते कौशल्याने पुरावे एकत्र करून सापळा लावतात आणि या सापळ्यात लाचखोर सापडत आहे. अलीकडे अशा सापळ्यात विविध विभागाचे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी अडकत आहेत. अर्थात अशा कारवाया सुरु असल्या तरी लाचखोरी कमी होताना दिसत नाही. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मात्र वेगळीच घटना समोर आली आहे. 


लेंडेझरी वनपरिक्षेत्रात विटपूर बीटमध्ये क्षेत्र सहायक या पदावर कार्यरत असलेले अजबराव सीताराम लोहारे (परसोडी, त. उमरेड) यांनी गळफास लावून जंगलातच आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आणि वन विभागात एकच खळबळ उडाली. घरातून ते ड्युटीवर जातो म्हणून बाहेर पडले आणि त्यांचा मृतदेह गायमुख जंगलात आढळून आला. जंगलातील खैराच्या झाडाजवळ या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडणे स्वाभाविक होते. (Forest employee commits suicide due to investigation) अचानक घडलेला हा प्रकार कशामुळे घडला ? याबाबत तर्क वितर्क सुरु झाले आणि परिसरात चर्चाही होऊ लागली. परंतु लोहारे यांचा मुलगा मनीष लोहारे याने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या घटनेवर प्रकाश पडला.


वाळूचा ट्रॅक्टर सोडण्यासाठी लेंडेझरी येथे पंधरा हजार रुपयांची लाच घेताना एक सापळा कारवाई झाली होती. ही लाच घेताना वन विभागातील ((Bhandara Forest department)) दोन वनरक्षकासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. याची अधिक चौकशी सदर विभागाकडून सुरु होती. या चौकशीसाठी लोहारे याना देखील बोलावण्यात आले होते. चौकशीला बोलावले गेल्याने ते घाबरून गेले होते. या चौकशीचा धसका त्यांनी एवढा घेतला की चौकशीसाठी हजर होण्याऐवजी त्यांनी थेट गायमुख जंगल गाठले आणि तेथेच आत्महत्या केली. त्यांच्या या धसक्यामुळे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब उघड्यावर पडले आहे. लाच घेताना पकडलेले बिनधास्तपणे चौकशी आणि खटल्याला सामोरे जातात आणि लाच न घेतलेल्या या कर्मचाऱ्याने थेट आपले जीवन संपवले आहे. 


लाचेही कारवाई झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्या प्रकरणाची सखोल चौकशी करीत असतो. कार्यालयातील संबंधित कागदपत्रे तपासली जातात आणि याच तपासासाठी (
inquiry)संबंधित कर्मचारी यास कागदपत्र घेऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागात हजर होण्यासाठी सांगितले जाते. काही कागदपत्र तपासून संबंधित कर्मचाऱ्यास काही प्रश्न विचारले जातात. या चौकशीला सामोरे जाण्याऐवजी लोहारे यांनी थेट टोकाचे पाऊल उचलले.  


  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !