BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ सप्टें, २०२२

पंढरपूर तालुक्यातील दोन टोळ्या हद्दपार !

 


शोध न्यूज : वाळू तस्कर आणि शांतता भंग करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील दोन टोळ्यांना सहा तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. एका टोळीला एक वर्षासाठी तर दुसऱ्या टोळीवर सहा महिन्यासाठी हा हद्दपारीचा आदेश देण्यात आला आहे. 


वाळूचोरांचा धुमाकूळ सतत सुरु असून कितीही कारवाया केल्या तरी वाळू चोरीची प्रकरणे अविरत सुरु आहेत. वाळू चोरीच्या अवैध मार्गातून मिळणारा पैसा गुंडगिरीच्या मार्गाने वापरात येतो आणि त्यातून सामाजिक शांततेलाही धक्का बसत असतो. पोलीस आणि महसूल प्रशासन वाळू चोरांवर कारवाई करते पण बाहेर येताच पुन्हा वाळू चोरीचा सपाटा लावला जातो. वाळू उपसा करणाऱ्या बोटी फोडल्या जातात, वाळू चोरांना अटक केली जाते पण वाळू चोरी एकदाही पूर्णपणे बंद झालेली नाही, त्यामुळे जनतेत देखील प्रशासनाबाबतच्या प्रतिमेला मोठा धक्का लागलेला आहे. प्रशासनाने आता पुन्हा पंढरपूर तालुक्यातील दोन टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. 


पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर, आंबे, अनवली येथील दोन टोळ्या हद्दपार करण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. पंढरपूर तालुक्यात आंबे येथील वाळू उपसा करणारे तसेच मारामारी, भांडण करणाऱ्या टोळीतील काही जणांवर हद्दपारीची ही कारवाई करण्यात आली आहे. यात पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील तानाजी शिवाजी शिंदे, हरी शिवाजी शिंदे, बापू शिवाजी शिंदे, शंकर राजाराम शिंदे, धनाजी उद्धव शिंदे, निशाल बापू शिंदे, विलास उर्फ विकास बापू शिंदे, सिद्धू सुरेश नागाने, बाबासाहेब उर्फ बाबूराव मनोहर जाधव, आनंद जनार्धन सगर यांचा समावेश आहे. वाळूचा अवैध उपसा करून विक्री करण्याबाबत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने आणि या लोकांमुळे दहशत वाढत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

  • राष्ट्रवादीच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे आणि आंबे येथील उपसरपंच निशाल शिंदे याचा हद्दपारीच्या कारवाईत समावेश !

सदर टोळीस पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माढा, मोहोळ, माळशिरस या तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश निघाले आहेत. मारामारी आणि मालाविषयक गुन्हे करणाऱ्या दुसऱ्या टोळीतील पंढरपूर तालुक्यातील आणवली येथील शरद शिवाजी गांजाळे, बिरुदेव शिवाजी कोकरे, सोमनाथ तानाजी बनसोडे यांना तर गोपाळपूर येथील संजय ज्ञानेश्वर गडदे आणि प्रवीण अशोक मेटकरी यांना सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षे कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Two gangs deported from Pandharpur taluka ) यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालाविषयक आणि शरीराविषयक गुन्हे करीत नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण केले म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !