BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२२

शिकाऊ चालकाने दुचाकीला दिली धडक, दोन जखमी !

 



शोध न्यूज : नवशिक्या चालकाने दुचाकीस धडक दिल्यामुळे भाऊ बहिण जखमी होण्याची घटना पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे घडली आहे. या प्रकरणी मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक तरुण तरुणी स्थानिक मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतात. या स्कूलच्या माध्यमातून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पंढरपूर येथे अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत असून श्रीनिवास मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडून प्रशिक्षण दिले जात असताना शिकाऊ चालकाकडून हा अपघात झाला आणि यात भाऊ बहिण जखमी झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे येथे अपघाताची ही घटना घडली आहे. पंढरपूर येथील महावीर नगरमधील अक्षत स्वप्नील फडे हे या स्कूलच्या माध्यमातून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेत असताना ही घटना घडली आहे.  


पंढरपूर येथील चंद्रकांत बाळकृष्ण पवार यांच्या ओम श्रीनिवास मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूलच्या माध्यमातून फडे हे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेत असताना त्यांना कडबे गल्ली येथील अवधूत नागनाथ तोडकरी हे वाहन चालविण्यास शिकवत होते.  यावेळी पंढरपूरकडून वाखरीच्या दिशेने जाताना गोसावी पेट्रोल पंपाच्या समोरच्या बाजूस ही घटना घडली. शिकाऊ चालकाने गाडी अचानक वळविल्यामुळे वाखरीच्या दिशेने निघालेल्या एका दुचाकीला या गाडीने जोराची धडक दिली. अचानक झालेल्या या घटनेत दुचाकी खाली पडली आणि इसबावी येथील स्नेहल संतोष दराडे (वय २२) आणि सार्थक संतोष दराडे (वय १४) हे दोघे जखमी झाले. 


या अपघाताबाबत माहिती मिळताच संतोष दराडे हे तातडीने अपघातस्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही जखमींना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  सदर प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून श्रीनिवास मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे व्यवस्थापक आणि कारचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Trainee driver hits two-wheeler, two injured) वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात असताना अपघात झाल्याने याची चर्चा देखील सुरु आहे.   


प्रवासी बसला अपघात !

सोलापूरजवळ खाजगी  ट्रॅव्हल्स बसला झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावर प्रवासी बसला हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर सहा प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने जिवितहानी मात्र झाली नाही. 


खाजगी प्रवासी बस वेगात निघालेली असतानाच बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उड्डाणपुलावर असताना रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यामुळे बस पलटी झाली. ही बस मुंबईहून कर्नाटक राज्यातील शहापूर येथे प्रवाशांना घेवून निघाली होती परंतु अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबी चिचोली येथे हा अपघात झाला. भरधाव वेगातील बस उड्डाणपुलावर येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर आदळून नंतर पलटी झाली. या बसमधून तीस पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात ५३ वर्षीय बसचालक महंमद नाशीर अहमद मैनुद्दीन यांचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील सहा प्रवासी जखमी झाले.  


घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना मदत केली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना त्वरित सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. (One killed in private bus accident near Solapur) जखमी प्रवाशांची प्रकृती ठीक असून यात कुणीही गंभीर स्वरूपाचे जखमी झाले नाहीत. चालकाचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे.   



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !