BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२२

पंढरपूर तालुक्यात अवैध दारूचा मोठा साठा हस्तगत !



शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आढळून आला असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


काही दिवसांपूर्वीच सांगोला तालुक्यात अवैध दारूचा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला असतानाच आता पंढरपूर तालुक्यात अशा प्रकारची अवैध दारू सापडली आहे. सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथील नवनाथ शत्रुघ्न पाटील याने पंढरपूर तालुक्यातील त्याच्या शेतात अवैधरीत्या दारूचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कराड मार्गावरील अजिंक्यतारा हॉटेल आणि हॉटेलच्या मागच्या बाजूस असलेल्या एका घरात अवैध देशी विदेशी दारूचा साठा असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. 


पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन पंचांना घेवून सदर ठिकाणी छापा टाकला असता देशी विदेशी अवैध मद्याचा मोठा साठा केला असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या दारूची मोजणी केली असता १ लाख ८३ हजार ७८० रुपयांची ही दारू असल्याचे आढळून आले. विविध कंपनीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स अवैधरित्या साठा करून ठेवण्यात आले होते. सदर मद्य पंचांच्या साक्षीने जप्त करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी बंडू भारत पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. हॉटेल मालक नवनाथ पाटील (गायगव्हाण, ता. सांगोला) हा मात्र पोलिसांना सापडला नाही.  


हॉटेल मालक नवनाथ पाटील आणि व्यवस्थापक बंडू भारत पाटील हे दोघेही सांगोला तालुक्यातील असून त्यांनी अवैधरीत्या १ लाख ८३ हजार ७८० रुपये किमतीच्या देशी वेदेशी मद्याचा बेकायदा साठा केल्यामुळे (A large stock of illegal liquor seized in Pandharpur taluka) पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई), ६८ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


चौदा लाखांचे मद्य !

सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथे मोठी कारवाई करीत गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांगोला पोलिसांनी अवैध दारू साठा जप्त केला होता. एकूण १४ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचा देशी दारूचा अवैध साठा पोलिसांनी जप्त करून पंढरपूर येथील तिघांना ताब्यात घेतले होते. विशेष  पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेवून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारूवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सांगोला पोलिसांनी अशा अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी पथके निर्माण केली होती. त्यानुसार लाखो रुपयांची दारू जप्त केली गेली होती. त्यानंतर काही दिवसातच पंढरपूर तालुक्यात ही कारवाई झाली आहे.


गायगव्हाण येथे एका रस्त्यालगत उत्तम भगवान रणदिवे यांच्या घराशेजारी अवैध दारूचा मोठा साठा असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि त्याच्या आधारे पोलिसाचे एक पथक मध्यरात्रीच्या नंतर सदर ठिकाणी जाऊन धडकले. या ठिकाणी अवैध दारूचे २१० दहा बॉक्स आढळून आले. या अवैध दारूची किंमत १४ लाख ११ हजार २१० रुपये आहे.  पोलिसांनी या बॉक्समधून तब्बल २० हजार १६० बाटल्या जप्त केल्या होत्या.  पंढरपूर तालुक्यात सापडलेल्या या साठ्याचेही कनेक्शन सांगोला तालुका आणि गायगव्हाण याच गावाशी आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !