BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० सप्टें, २०२२

माफी माग नाहीतर तुला सोडत नाही ! पोलीस पत्नींचा सणसणीत इशारा !!

 


शोध न्यूज : 'सगळ्या पोलिसांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही' अशा शब्दात पोलिसाच्या पत्नीने खासदार नवनीत राणा यांना इशारा दिला आहे.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सतत टीकेच्या लक्ष्य बनत असून हनुमान चालीसा' प्रकरणापासून महाराष्ट्रात देखील त्यांच्यावर अत्यंत कडक शब्दात टीका होत आहे.  तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन 'हनुमान चालीसा' वाचणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती आणि त्यावरून बरेच रणकंदन माजले होते. समाजाच्या विविध घटकातून राणा यांच्यावर टीकेची झोड उठली होती. हनुमान चालीसा मंदिरात वाचा, कुणाच्या घरासमोर जाऊन नाही' अशा प्रकारच्या जोरदार प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटलेल्या होत्या. त्यानंतरही त्यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरली आहेत आणि आता लव्ह जिहाद चे नसलेल्या प्रकरणाबाबत वादंग सुरु झाले आहेत. 


अमरावती येथे एका मुलीच्या बेपत्ता होण्यावरून एक नवाच वाद उफाळून आला. हिंदू तरुणीला पळवून नेऊन तिचा आंतरधर्मीय विवाह केल्याचा आणि तिला डांबून ठेवले असल्याचा आरोप सदर मुलीच्या नातेवाइकानी केला होता. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, खासदार अनिल बोंडे यांच्यासह काही हिंदू संघटनांनी हे प्रकरण लव जिहादचे असल्याचा आरोप केला आणि एकूण प्रकरणाला पुढे वेगळे वळण लागत राहिले. खासदार राणा यांनी या विषयावरून पोलीस ठाण्यात वीस मिनिटे राडा घातला आणि पोलिसांना बरेच काही सुनावले. मुलीचा शोध नाही लावला तर आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. 


सदर मुलीचा शोध लागला तेंव्हा लव जिहादचे हे प्रकरण नसल्याचे समोर आले आणि त्या मुलीने देखील नवनीत राणा यांनी आपली अकारण बदनामी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र राजकीय वर्तुळातून देखील राणा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी पोलिसांच्या पत्नी एकवटल्या असून त्यांनी खासदार राणा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि राणा यांचा एकेरी उल्लेख करीत सणसणीत इशारे दिले आहेत. पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी केलेल्या बाचाबाचीवरून पोलिसांचे कुटुंब अत्यंत आक्रमक झाले आहे. (
Police wife's stern warning to MP Rana) त्यातच पोलीस पत्नी वर्षा भोयर यांचा एक बाईट सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल होऊ लागला आहे.


" नवनीत राणा, तुला माणुसकी असेल तर सगळ्या पोलिसांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही. नवनीत रण, तुला शेवटची संधी देते, तू पोलिसांच्या काळजाला हात घातलेला आहे. कोरोनाच्या काळात रात्रभर पोलिसांनी आपले कर्तव्य पालन केले आहे. तुला पोलिसांचे दु:ख कळणार नाही... पोलिसांच्या बद्धल तू नेहमीच अपशब्द वापरत असते" अशा अत्यंत कडक शब्दात पोलीस पत्नींनी राणा यांना इशारा दिला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !