BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ सप्टें, २०२२

सोलापूर जिल्ह्यात रूळ सोडून रेल्वे घुसली शेतात !

 



शोध न्यूज : रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले असताना आता रेल्वेही मागे राहिली नसून सोलापूर जिल्ह्यातील केम येथे रूळ सोडून रेल्वे थेट शेतात घुसली आहे. 


रस्त्यावरील अपघात प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेतच, सगळीकडे अपघात होत असून अनेकांचे प्राण जात आहेत, राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित मानला जात होता पण आता एसटी बस चे देखील अपाघात होऊ लागले आहेत. रेल्वेचेही अपघात अधूनमधून होत असतात पण रेल्वेच्या किरकोळ अपघातात जीवितहानी होत नाही. करमाळा तालुक्यातील केम येथे एका रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ सोडून थेट शेतात घुसल्याची घटना काल रात्री घडली आहे. रेल्वेचे दोन्ही इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरले आणि दोन्ही इंजिन शेतकरी रवी खाणट यांच्या शेतात घुसले. कुर्डूवाडी - जेऊर रेल्वे मार्गावर केम रेल्वे स्टेशन आहे. 


अचानक रेल्वे इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरून रेल्वे इंजिन शेजारच्या शेतात पोहोचले त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेत जीवितहानी झालेली नाही परंतु रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले आहे.  सोलापूर- पुणे असा रेल्वेचा दुहेरी मार्ग असून या अपघातामुळे एका मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वेने तातडीने क्रेनच्या सहाय्याने इंजिन उचलून रुळावर घेतले असून लोहमार्ग पुर्ववत करण्यासाठी युद्धापातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण कामासाठी काही काळ जाणार असून या घटनेने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. 


सोलापूरकडून पुण्याकडे निघालेल्या मालगाडीला हा अपघात झाला. सोलापूर -  पुणे मार्गावर लूप लाईनवर हा अपघात घडला असून रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अखंड प्रयत्न करीत आहेत. लूप लाईनवर घटना घडल्याने इतर रेल्वे वाहतुकीला अधिका काळ अडचण निर्माण झाली नाही. (Train derailed in Solapur district, Near Kem) रेल्वे इंजिन डब्यासह रुळावरून खाली आल्याने ही घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !