BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ सप्टें, २०२२

पंतप्रधान मोदींचा फोटो नाही म्हणून जिल्हाधिकारी यांना झापले !


शोध न्यूज : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का लावला नाही म्हणून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जिल्हाधिकारी यांनाच झापले आणि अर्ध्या तासात फोटो लावण्याचे आदेश देण्यात आले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो संदर्भात विरोधकांनी अनेकदा टीका केली आहे. पेट्रोल डीझेलचे दर वाढत असताना पेट्रोल पंपावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहून सामान्य नागरिकही चर्चा करीत होता आणि विरोधकांनी तर याचे भांडवल केले होते. या फोटोविषयी सतत टीका केली जात होती. त्यानंतर कोरोन प्रतिबंधक लसीच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचे फोटो कशासाठी ?  असा सवाल सातत्याने उपस्थित होत होता. लसीकरण प्रमाणपत्रावर हा फोटो छापायचा असेल तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही त्यांचा फोटो छापण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. फोटोंचा विषय सतत चर्चेत राहिलेला असताना आता पुन्हा हा विषय चर्चेला आला आहे. 


अर्थमंत्री निर्मला सीतारामण या काल तेलंगाना दौऱ्यावर होत्या. तेथील रास्त भाव दुकानात पुरवल्या जाणाऱ्या तांदळात केंद्राचा किती वाटा आणि राज्य सरकारचा किती वाटा आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना विचारले असता जिल्हाधिकारी उत्तर देवू शकले नाहीत त्यामुळे अर्थमंत्री सीतारामण यांनी जिल्हाधिकाऱ्याना बरेच काही सुनावले. परंतु सीतारामण यांचे हे वागणे बरे नसल्याचे मंत्री के टी रामाराव यांनी म्हटले आहे. अशा वागण्याने अधिकारी वर्गाचे मनोधैर्य खचेल असे म्हणत त्यांनी जिल्हाधिकारी जितेश पाटील यांचे कौतुक केले. 


रास्त भाव दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र नसल्याचे पाहूनही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जिल्हाधिकारी यांना झापले. रेशन दुकानात पंतप्रधानांचा फोटो का नाही? असा सवाल त्यांनी जिल्हाधिकारी यांना विचारला. (Finance Minister angry with Collector for PM Modi's photo) जिल्हाधिकाऱ्याना याबाबत बरेच काही सुनावल्यानंतर "अर्ध्या तासाच्या आत रेशन दुकानात फोटो लावा " असा आदेश देखील निर्मला सीतारमण यांनी दिला. रेशन दुकानातून नाममात्र दराने तांदूळ दिला जातो त्याचा केंद्र सरकार ३० रुपये खर्च उचलते आणि राज्य सरकार केवळ १ रुपया देते तरीही तेलंगणात रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावत नाहीत असे सांगत सीतारामन यांनी नाराजी व्यक्त करीत संतापही व्यक्त केला. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !