BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ सप्टें, २०२२

तलाठ्याला डंपरखाली चिरडून मारण्याचा थरारक प्रयत्न !



शोध न्यूज : अवैध मुरूम वाहतुकीच्या डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची थरारक घटना पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. 


वाळू, मुरूम अथवा अन्य गौण खनिज यांची चोरी तर चालूच आहे पण या तस्करांची मुजोरी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना ठार मारण्यापर्यंत देखील जात असते या आधीची अनेकदा दिसून आले आहे. 'चोर तो चोर, वर शिरजोर' अशा पद्धतीने हे चोर मग्रुरी करीत असतात. सांगली जिल्ह्यात तर अत्यंत थरारक प्रकार घडला असून तलाठ्याच्या अंगावर डंपर घालून चिरडून ठार करण्याचा अत्यानात धक्कादायक आणि तितकाच थरारक प्रकार घडला असल्याची तक्रार तलाठ्याने पोलीस ठाण्यात दिली असून आष्टा पोलिसांनी याबाबत चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत पोखर्णी येथील तलाठी सागर जगन्नाथ भोसले हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


पोखर्णीच्या दगड खाणीमधून ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून दगड, माती, मुरूम आणि खाडी यांची अवैधरित्या वाहतूक सुरु असल्याची माहिती तलाठी सागर भोसले याना मिळाली. त्यानुसार कोतवाल गणपती स्वामी आणि पोलीस पाटील वसंत कुंभार याना सोबत घेऊन भोसले संबंधितांवर कारवाई करण्यासाठी गेले आणि रस्त्याच्या बाजूला संबंधित वाहनांची वाट पाहात थांबले. काही वेळात विशाल पाटील यांचा विना क्रमांकाचा मुरुमाने भरलेला डम्पर आलेला दिसला. कारवाई करण्यासाठी तलाठ्याने डंपर थांबवला. याप्रकरणी चालक आणि तलाठी भोसले यांच्यात वादावादी सुरू झाली. प्रकरण वाढू लागताच डंपरमधील अन्य एका व्यक्तीने फोन करून डंपर मालक विशाल पाटील याला बोलावून घेतले. दरम्यान महसूल विभागाचा एक कर्मचारी डंपरचे फोटो काढत होता. याचवेळी पाटील तेथे आल्यावर त्यांच्यासोबतच्या व्यक्तीने महसूल कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. 


महसूल कर्मचारी आणि सदर व्यक्ती यांच्यात भांडण सुरु झाले त्यामुळे तलाठी सागर भोसले मध्ये पडले. दरम्यान डंपर मालक पाटील याने तलाठी भोसले याना जाब विचारायला सुरुवात केली. 'तू इथे कशासाठी आला आहेस? तुझा संबंध काय, मस्ती आलीय का तुला ? असे म्हणत धक्काबुक्की केली, त्याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने भोसले यांची कॉलर पकडली आणि डंपर चालकाला गाडीतील लोखंडी रॉड काढायला सांगितले. 'याला आता ठार मारायचे आहे, याच्या अंगावर गाडी घाल' असे सांगितले. विशाल पाटील याने तलाठी भोसले याना पकडून डंपरपुढे पकडाडुन ठेवले. डंपर चालकाने वेगाने डंपर पुढे घेत तलाठी भोसले यांच्या अंगावर आणला. भोसले डंपरखाली चिरडले जाणार एवढ्यात महसूल कर्मचारी हृषीकेश टाकले यांनी त्यांना बा जूला ओढले.  अन्यथा भोसले यांच्या अंगावरून डंपर जाऊन भोसले हे तेथेच ठार झाले असते. 


अत्यंत थरारक अशा या प्रकारात भोसले यांच्या उजव्या खांद्याला डंपरची धडक बसून ते जखमी होण्यावर निभावले. हा सर्व प्रकार वाढू लागल्याचे दिसल्याने डंपरमधील मुरूम काही अंतरावर खाली ओतण्यात आला आणि डंपर मालक पाटील यांच्यासह सगळे तेथून निघून गेले. अशा आशयाची फिर्याद जखमी तलाठी सागर भोसले यांनी पोलिसात  असून पोलिसांनी घेऊन दाखल केला आहे. डंपर मालक विशाल तानाजी पाटील यांच्यासह अन्य लोक असा चौघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या घटनेने महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Horrible attempt to crush Talathi under the dumper) ही घटना घडल्यानंतर उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, अप्पर तहसीलदार धनश्री भांबुरे तसेच विभागातील कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. महसूल कर्मचारी वर्गातून या घटनेचा निषेध केला जाऊ लागला आहे.    

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !