BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ सप्टें, २०२२

स्कुटीत लपला कोब्रा ! काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ


शोध न्यूज : पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात विषारी नाग कुठे आश्रय घेईल हे सांगता येत नाही. एक विषारी कोब्रा चक्क एका स्कुटीत जाऊन बसल्याचा एक काळजात धस्स करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


पावसाळ्याच्या दिवसात साप, नाग यांचा उपद्रव नेहमीच वाढत असतो. पावसाचे पाणी वारुळात तसेच सापाने आश्रय घेतलेल्या बिळात जाते आणि मग हे विषारी प्राणी आश्रय शोधत असतात. रानावनात, झाडाझुडपात या विषारी प्राण्यांचे दर्शन होत राहतेच पण अनेकदा हे नाग, साप माणसांच्या घरात आश्रयाला येतात. त्यामुळे माणसांच्या जीवाला नेहमीच धोका असतो. पावसाळ्याच्या दिवसात अनेक घरात नाग घुसल्याची उदाहरणे घडत आहे. नदी, नाले पाण्याने भरून वाहू लागल्यावर तर असा उपद्रव हमखास वाढत असतो. या पावसाळ्यात देखील अनेकांच्या घरात नाग आढळून आले आहेत. पावसामुळे नाग हे नागरिकांच्या घरात घुसतात आणि नकळत त्यांना धक्का लागताच ते दंश करतात त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. 


नागासारखे विषारी प्राणी केवळ घरात घुसतात असे नाही तर ते निवारा मिळेल तेथे आश्रय घेतात आणि गाफील क्षणी माणसाना मोठा धोका होऊ शकतो. दारात उभ्या केलेल्या वाहनात देखील हे नाग आश्रय घेतात. नेहमीप्रमाणे गाडी काढायला गेल्यावर गाडीत आश्रय घेतलेले साप, नाग दृष्टीला पडत नाहीत आणि अशा वेळीच ते दंश करण्याची अधिक शक्यता असते. दारातील उभ्या असलेल्या गाडीत साप शिरल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या असून गाडी सुरु करण्यापूर्वी दक्षता घेणे किती आवश्यक आहे हेच नंतर लक्षात येते. (Cobra hides inside the scooter Horrible video) असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो पाहताना देखील काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. 


सुशांत नंदा यांच्या ट्वीटर वरून असा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दारात उभ्या असलेल्या एका स्कुटीच्या पुढच्या भागात एक भला मोठा कोब्रा लपून बसला आहे. गाडीकडे पहिले असता त्याची कुठेही हालचाल जाणवत नाही की हा 'काळ' गाडीत असल्याची जाणीव होत नाही. एवढा भला मोठ्ठा नाग स्कुटीच्या लाईटच्या मागे असू शकेल याची कल्पनाही कुणाला येत नाही. सुदैवाने एक स्कुटी चालकाला त्याची जाणीव झाली आणि सर्पमित्राची मदत घेवून त्याला बाहेर काढण्यात आले. स्कुटीच्या वरचा भाग थोडासा सरकवताच हा 'काळ' हल्ला करायला तयार होतो आणि पाहणाऱ्याच्या काळजाचे पाणी होते. तुम्हीच पहा हा व्हिडीओ !

        

https://twitter.com/i/status/1435218101998546949 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !