BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ सप्टें, २०२२

खवळलेल्या गाईने मालकालाच चिरडून केले ठार !

✪ आत्ताची मोठी बातमी ✪➤ भीमा नदीचा पूर आता आणखी वाढणार ! उजनीतून एक लाख क्युसेक्सचा विसर्ग, पंढरपुरात व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरण्यास झाली सुरुवात.. दौंड येथील विसर्ग वाढल्याने भीमा नदीला पुराची मोठी परिस्थिती ! दौंड येथे १ लाख ३५ हजाराचा विसर्ग उजनी जलाशयात ! ✪➤! ✪➤ !✪➤➤ !!✪ ✪➤➤

 


Title of the document


शोध न्यूज : गाय खवळली आणि संतापाच्या भरात तिने आपल्याच मालकाला चिरडून ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली असून जिच्या जीवासाठी केले तिनेच जीव घेतला असा हा प्रकार घडून आला आहे.

 
मुके प्राणी माणसांच्या प्रेमात पडतात आणि त्यांना लळा लावल्यावर ते माणसांसाठी आपला जीव देखील द्यायला तयार असतात. अनेक मुख्य प्राण्यांनी हे कृतीतून दाखवूनही दिले आहे. मालकांचा मृत्यू झाला तर माणसाप्रमाणे ही मुकी जनावरे देखील डोळ्यातून अश्रू ढाळतात, खाणे पिणे सोडतात. मालकावर अचानक काही संकट आले तर त्याच्या मदतीलाही हे मुके प्राणी धावून जातात. असे प्रसंग केवळ चित्रपटात नव्हे तर प्रत्यक्षात अनेकांनी अनुभवलेले असतात. कोल्हापूर जिल्हातील परिते येथे मात्र एक विपरीत घटना घडली असून गाईचा जीव वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या मालकाचाच तिने जीव घेतला आहे. 


सद्या लम्पी च्या प्रादुर्भावामुळे पशुधन धोक्यात आले आहे. काही करून आपले पशुधन वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकरी आणि पशुपालकासमोर आहे. शासनाने लम्पी नियंत्रणासाठी वेगाने लसीकरण मोहीम राबविणे सुरु केला आहे. त्यानुसार परिते येथे आज लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. परिते येथील सतीश शंकर कारंडे या पन्नास वर्षीय शेतकऱ्याने आपल्याही गाईचे लसीकरण करून घ्यावे म्हणून गाय लसीकरण केंद्रावर नेण्याचा प्रयत्न केला आणि यातच त्यांना जीव गमवावा लागला. गाय हा गरीब आणि शांत प्राणी म्हणून पहिला जातो पण हीच गाय संतापली आणि तिने आपल्या मालकास तुडवून तुडवून चिरडून मारून टाकले. तिच्याच जीवासाठी मालक आटापिटा करीत होता पण घडले ते वेगळेच !


शेतकरी सतीश कारंडे आणि त्यांची पत्नी यांनी आपल्या एका गाईचे लसीकरण करून तिला परत गोठ्यात नेऊन बांधले. दुसऱ्या गायीला लसीकरण करण्यासाठी घेवून जायचे होते त्यामुळे तिचा कासरा सोडण्यात आला. यावेळी अचानक काय झाले हे कुणालाच समजले नाही पण ही गाय एकदम उधळली. गायीचा धक्का लागल्यामुळे सतीश कारंडे हे जमिनीवर कोसळले. यावेळी गाईने त्यांना अक्षरश: पायाखाली तुडवले. गाय प्रचंड संतापलेल्या अवस्थेत दिसत होती. कारंडे यांच्या पत्नीने आरडाओरडा केला पण गाईवर कसलाच परिणाम झाला नाही. खवळलेल्या अवस्थेत गाईने कारंडे यांना गोठ्यात फरफटले. यात ते गंभीर जखमी झाले आणि बेशुद्ध होऊन पडले. कारंडे यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी दुखापत झाली होती.


या सर्व प्रकाराने गोठ्यात एकाच गोंधळ उडाला होता. हा सगळा आवाज शेजारी पोहोचला होता. काहीतरी वेगळा प्रकार जाणवल्याने शेजारील शेतकरी धावत या गोठ्यात पोहोचले. कारंडे यांचा मुलगा आणि नातेवाईक देखील धावत गोठ्याकडे आले. जखमी आणि बेशुद्ध झालेले सतीश कारंडे यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच कारंडे यांचा मृत्यू झाला होता. लम्पी आजाराच्या प्रादुर्भावापासून गाईचे रक्षण करण्यासाठी गेलेल्या गाईनेच मालकाचा अशा पद्धतीने जीव घेतल्याची घटना परिसरात पसरली आणि प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. 


पाळीव प्राणी अशा प्रकारे हिंसक होत नाहीत आणि आपल्या मालकावर असा जीवघेणा हल्ला करीत नाहीत असा अनुभव सर्वांनाच आहे पण ही गाय अचानक का बिथरली आणि तिने अशा प्रकारे हल्ला कशासाठी केला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. (The angry cow crushed the owner to death) घडलेल्या घटनेबाबत मात्र चिंता व्यक्त होऊ लागली आहे. ही घटना मात्र सर्वांसाठीच विचारात पाडणारी ठरली आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !