BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२२

'आमचं प्रेम समाजाला मान्य नाही' म्हणत प्रेमी युगालाची आत्महत्या !

 



शोध न्यूज : समाजाला आमचे प्रेम मान्य नाही म्हणत एका दोरीत प्रेमी युगुलाने आपल्या जीवनाचा शेवट केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 


प्रेमाच्या नावाने अनेक तरुण तरुणी आपले अनमोल जीवन भिरकावून देतात हे काही नवे नाही, प्रेमाचा अर्थ कळण्याच्या आधीच प्रेमाच्या नावावर आपले आयुष संपविले जात असल्याच्या अनेक घटना घडत असतात. सोलापूर जिल्ह्यातील एका युगुलानं देखील अशाच प्रकारे आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात बीबी दारफळ या गावातील ही करुण घटना आज उघडकीस आली आणि अवघा सोलापूर जिल्हा हादरून गेला. 'एक दोरी आणि दोन आत्महत्या' असा हा प्रकार घडला आहे. सोबत जगता येत नाही तर सोबत मरता तरी येते हेच दाखवत एक तरुण आणि एका तरुणीने एकाच दोरीला गळफास घेतला आहे. 


प्रांजली भारत सुतार हिने गतवर्षीच बीबी दारफळ येथल गणेश विद्यालयात शिक्षण घेताना बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. अशी गुणी हुशार मुलगी विवाहित असलेल्या वाजिद चांद इनामदार याच्या प्रेमात पडली होती. वाजिद याचे लग्न झाले असतानाही तो प्रांजलीच्या प्रेमात अडकला होता. अशा प्रेमाला समाज मान्यता देणार नाही उघड होते. त्यामुळे त्यांनी दोघांनीही आयुष्याचा शेवट करण्याचा टोकाचा आणि धक्कादायक निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही दोन वेगवेगळ्या चिठ्या लिहून ठेवल्या आहेत. "आमचं प्रेम समाजाला मान्य नाही " असे या चिट्ठीत लिहिण्यात आले आहे. राहत्या घरातच या दोघांनीही एकाच दोरीला गळफास घेतला आहे. 


आज जेंव्हा ही घटना उघडकीस आली तेंव्हा बीबी दारफळ परिसरात खळबळ उडाली. ज्याच्या त्याच्या तोंडी याच घटनेची चर्चा सुरु झाली. सोलापूर तालुका पोलिसांना या घटनेबाबत कळविण्यात आले तेंव्हा तातडीने पोलीस दाखल झाले आणि दोघांचे लटकते मृतदेह दोरीवरून खाली काढण्यात आले. (Love is not accepted by society, suicide of a loving couple) दोघांनी लिहिलेल्या दोन स्वतंत्र चिठ्या पोलिसांना मिळाल्या असून "आमचं प्रेम समाजाला मान्य नाही ... आमच्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये" असे त्यात म्हटले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात आज याच घटनेबाबत चर्चा असून परिसर मात्र हळहळ करू लागला आहे. 

    




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !