BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२२

लंपी रोगामुळे सत्तर हजार जनावरांचा मृत्यू !


 


महाराष्ट्रासह देशात वाढत असलेल्या 'लंपी' मुळे देशातील ७० हजाराहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला असून जनावरांच्या गोठ्यात कडूनिंबाचा धूर करण्याचे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. 


जनावरांना लम्पी आजाराचा मोठा प्रादुर्भाव होऊ लागला असून देशाच्या विविध भागांसह तो महाराष्ट्रात देखील पसरत चालला आहे. महाराष्ट्रात वीस जिल्ह्यात अधिक प्रादुर्भाव असून राज्यात आत्तापर्यंत लम्पीमुळे ४२ जनावरांचा मृत्यू झाला आहे तर देशात ७० हजार १८१ जनावरे या प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे पशुपालक धास्तावलेले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जनावरांचा बाजार, खरेदी विक्री, वाहतूक, शर्यती तसेच प्रदर्शन यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात १.४० कोटी गाई असून म्हशींची संख्या ५६ लाख ३ हजार ६९२ एवढी आहे. लम्पीने पशुपालक शेतकरी अडचणीत येऊ लाले असून त्यांच्या अर्थचक्र देखील विस्कळीत झाले आहे. 


लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांच्या गोठ्यात दररोज कडूनिंबाच्या पानांचा धूर केल्यामुळे आणि कीटकनाशकांची फवारणी केली तर गोठ्यात कीटक येत नाहीत अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी देत आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन वाचविण्यासाठी जनावरांच्या गोठ्यात कडूनिंबाच्या पानांचा धूर करण्याचा उपाय करणे आवश्यक ठरणार आहे. कडूनिंब हे औषधी झाड असून विविध आजारावर कडूनिंब रामबाण औषध ठरलेले आहे. माणसांसाठीही कडूनिंब उपयुक्त असून विविध आजारावर कडूनिंबाचे सेवन गुणकारी ठरत असते. (Seventy thousand animals died due to lumpy disease) शिवाय या झाडांच्या पानांचा धूर केल्यास डास तसेच कीटक पळून जातात.  


मदतीचा प्रस्ताव मंजूर 

प्राण्यांना होणाऱ्या लंपी आजारामुळे जनावरे दगावली जात असून शेतकरी संकटात येत आहे. जनावरांच्या मृत्यूमुळे त्याचे मोठे नुकसान देखील होत आहे. अशा संकटात पशु पालकांना सरकारकडून अर्थसहाय्य मिळावे म्हणून पशुसंवर्धन विभागाने शासनाला प्रस्ताव सादर केला होता आणि त्याला मान्यता मिळाली आहे. सन २०१५ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. हा एक दिलासा मिळू लागला आहे. या आजाराने राज्यात आत्तापर्यंत ४२ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.


दूध टाळावेच  !

लंपी आजाराचा धोका हा केवळ जनावरांना आहे, माणसांना या रोगाचा काहीही धोका नाही परंतु आजारी जनावरांचे दूध पिणे खाणे टाळावे असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी करीत आहेत. हा आजार म्हशींना होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. रोगाचा विषाणू एक ते दोन आठवडे रक्तात राहून नंतर शरीरात अन्य भागात त्याचे संक्रमण होते आणि अठरा ते पस्तीस दिवस विषाणू जिवंत राहतो. लम्पीचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचे दुध टाळण्यात यावे, जनावर या आजारातून पूर्ण बरे होत नाही तोपर्यंत हे दूध टाळावे असे काही तज्ञांनी म्हटले आहे तर दूधापासून काहीच धोका नाही असेही काही पशुवैद्यकीय अधिकारी सांगत आहेत.  या आजाराचे जनावरांचा मृत्यू झाला तर आठ फुट खोल खड्डा घेवून ते पुरण्यात यावे अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. 


लसीकरण आवश्यक !

गुजराथमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव अधिक असून गुजरातमधून येणाऱ्या जनावरांवर प्रशासनाने बंदी घातली आहे. शिवाय महाराष्ट्रात येणाऱ्या सगळ्याच जनावरांची तपासणी करण्यात येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण देखील हाती घेण्यात आले आहे परंतु त्याची व्याप्ती अत्यंत तोकडी असल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. शासनाने तातडीने जनावरांचे लसीकरण करून पशुधन वाचवावे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.  


राज्यात लम्पी चे थैमान !

राज्यात लंपीने चांगलेच थैमान घातले असून आजवर २ हजार ६६४ जनावरांना लागण झाली आहे. ३३८ गावात अशी बाधित जनावरे आदली असून आजवर पाच लाखांपेक्षा अधिक जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. सद्या १६ लाखांपेक्षा अक्धिक लसीची उपलब्धता असून अतिरिक्त पाच लाख लसी मिळणार आहेत. पुढच्या सप्ताहात तर पन्नास लाख लसी उपलब्ध होणार असल्यची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.  

 

जिल्हानिहाय बाधित 

सोलापूर जिल्ह्यात संक्रमीत जनावरांची संख्या दहा झाली असून अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ही कमी आहे. कोल्हापूर - २५, सांगली - २३, परभणी - २०, अमरावती - ३७८, वाशीम -२०, नाशिक - १०, यवतमाळ- ९, जालना - ७, पालघर जिल्ह्यात केवळ १ संक्रमित आहे. जळगाव जिल्ह्यात ५१२ तर अहमदनगर जिल्ह्यात २७७ संक्रमित जनावरे आहेत. बुलढाणा - २३३, अकोला - ६३६, पुणे- २०३, धुळे - ७९, लातूर - १०२, उस्मानाबाद - ९,  औरंगाबाद- ३२, बीड - २३, सातारा जिल्ह्यात ५५ संक्रमित जनावरे आढळून आली आहेत.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !