BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२२

चूक कुणाची, शिक्षा कुणाला ! एका अपघाताने निरपराध संपवले कुटुंब ! VDO


 

कुणाच्या तरी बेफिकीरीने इतर निरपराध लोकांचे अपघातात जीव जातात. वाहनांचे चालक किती बेफिकीर असू शकतात हे दाखवणारा एक व्हिडीओ समाज माध्यमांवरून व्हायरल होत असून एका भयानक अपघाताचे हे चित्रण आहे. 


अलीकडे सगळीकडेच रस्ते चकाचक झाले आहेत. रस्त्यावरील वाहनेही वाढली आहेत तसे रस्तेही रुंद करण्यात आले आहेत. एकीकडे रस्ते चांगले झाल्याचे समाधान असले तरी त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. जिकडे तिकडे अपघात आणि किडे मुंग्यासारखे माणसांचे जीव देखील जात आहेत. रस्त्यावरील प्रत्येकालाच प्रचंड घाई आहे आणि यासाठी ते स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत सुटलेले आहेत. रस्त्यावरून जाताना एक जण चूक करतो पण इतर अनेकांचे प्राण जातात. याचेही कुणाला काही वाटताना दिसत नाही. रस्ता फक्त आपल्या एकट्यासाठीच आहे अशा थाटात वाहने चालवली जातात. वाहनांचे वेग तर आता हवेशीच स्पर्धा करू लागले आहेत. त्यामुळे अपघात झाला की जीव जाणार हे नक्की ठरून गेलेले असते.


दुचाकी असो, चार चाकी असो की अवजड कंटेनर असो, ज्याला त्याला लवकर जायची घाई तर आहेच पण वाहतुकीचे नियम मात्र कुणालाच पाळायचे नाहीत. वेग आणि वाहतुकीचे नियम याकडे डोळेझाक केली की काय होते याचे भयानक वास्तव दाखवणारा हा थरारक व्हिडीओ आहे. रुंद असलेल्या मार्गावर देखील वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले की काय घडू शकते आणि अपघात नेमका कसा घडू शकतो हेच या सीसीटीव्ही फुटेजमधून पाहायला मिळत आहे. माल घेवून जाणारा १८ चाकी ट्रेलर वेगाने येताना दिसत आहे. तो त्याच्या रस्त्याने जात असल्यामुळे दुसऱ्या बाजूची वाहने सरळ निघून जात आहेत पण ट्रेलर आपला वेग जराही कमी न करता आणि काहीही सिग्नल न देता सरळ वळून दुसऱ्या रस्त्यावर येत आहे. 


वेग आणि वळण यामुळे अठरा चाकी ट्रेलर तर रस्त्यावर झोपतोच पण तो अचानक दुसऱ्या मार्गावर आल्यामुळे आपल्या मार्गाने जात असलेली तीन वाहने या ट्रेलरवर जाऊन आदळतात. रस्त्यावर अचानक आडव्या झालेल्या ट्रेलरला पाहून आपले वाहन नियंत्रित करण्याएवढा देखील वेळ त्या वाहनांना मिळत नाही. एक चार चाकी गाडी तर कोसळत असलेल्या ट्रेलरच्या खाली येथे आणि या अपघातात आई, वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू होतो. अन्य काही जण जखमीही झाले आहेत. बेहेराम इथल्या राष्ट्रीय महामार्गावर झालेला हा अपघात सीसीटीव्हीमुळे चित्रित झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू या अपघातात झाला आहे. एका चालकाची बेफिकिरी एक कुटुंब संपवून गेले आहे. पहा हा थरारक आणि वास्तव व्हिडीओ !  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !