BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ सप्टें, २०२२

साखर कारखाना गाळप हंगामाची तारीख ठरली !


शोध न्यूज : साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची यंदाची तारीख निश्चित झाली असून सहकार मंत्री अतुल सावे यांनीच ही माहिती दिल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. तशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे . 


गेल्या काही दिवसांपासून आगामी गळीत हंगामाबाबत शेतकरी ऊस उत्पादकांना उत्सुकता लागून राहिली असून याबाबत उलट सुलट चर्चाही होताना दिसत आहेत. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उस लागवड झाली आणि गळीत हंगाम लांबला तरी संपूर्ण ऊस गाळपासाठी कारखान्याला जाऊ शकला नाही. ऊस उत्पादक शेतकरी यामुळे मोठ्या अडचणीत आले. मुदत संपताच ऊस तोड करणाऱ्या बहुतेक टोळ्या परत गेल्या आणि शिवारात मात्र ऊस तसाच उभा आणि आडवाही होता. मजुराची उपलब्धता होत नसल्याने उपलब्ध मजुरांनी ऊस उतपादाकाना वेठीला धरले आणि वाट्टेल तशा मागण्या करू लागले. चोहोबाजूंनी शेतकरी कोंडीत सापडला होता. आता पुढच्या वर्षी तीच परिस्थिती येते की काय याच्या दडपणात शेतकरी दिसत आहे.


शासनाने कारखान्यांची गाळप क्षमता वाढवून दिली होती परंतु कित्येक शेतकऱ्यांचा उस कारखान्याला गेलाच नाही त्यामुळे मोठ्या कष्टाने वाढवलेला शिवारातील ऊस पेटवून देण्याची वेळ आल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. परंतु यंदा वेळेत गाळप हंगाम सुरु केला जाणार आहे, तशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनीच दिली आहे. गेल्या वर्षीचा अनुभव विचारात घेता यावर्षी १ ऑक्टोबर पासूनच गाळप सुरु करण्यात येणार असल्याचे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मागील वर्षी लाखो हेक्टर उसाचे गाळप होऊ शकले नाही आणि हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपला ऊस पेटवून दिला त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या वर्षीची ही अवस्था विचारात घेता यावर्षी गळीत हंगाम लवकर सुरु केला जाईल, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली असल्याचे सावे यांनी सांगितले आहे.  


गतवर्षी गळीत हंगाम संपला तरी मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक होता त्यामुळे यावर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी गळीत हंगाम लवकर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याप्रमाणे १५ सप्टेंबर रोजी एक बैठक घेण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने येत्या १ ऑक्टोबरपासून गाळप सुरु करण्याचे निश्चित करण्यात येईल. पंधरा दिवस आधीच गाळप सुरु केल्याने अखेरच्या टप्प्यात ऊस शिल्लक राहणार नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. (Date of Sugar Factory Sifting season fixed) हे नुकसान न झाल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची वेळ शासनावर देखील येणार नाही असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले आहे.  


एफआरपी बाबत बैठक 

एफआरपी दोन टप्प्यात देण्यात येते पण अनेकदा शेतकऱ्यांना दुससरा हप्ता दिला जात नाही. याबाबत शासन नियंत्रण आणणार असून यावर तोडगा काढला जाणार आहे. या विषयावर लवकरच एक बैठक बोलावण्यात येणार असून या बैठकीत सर्व साखर कारखान्याचे मालक उपस्थित असतील. त्यांच्याबरोबर चर्चा करून एफआरपी संदर्भात कसे नियंत्रण आणायचे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहितीही सहकार मंत्री सावे यांनी दिली आहे. 


ॲपवरून ऊसाची नोंदणी  !

उसाची नोंदणी आता एपवर करता येणार असून नोंदणी करतानाच शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या कारखान्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. दोन साखर कारखान्यात नोदणी करता येईल आणि उसाची गुणवत्ता, लागवडीचा कालावधी यानुसार या एपच्या माध्यमातून कारखान्यास उस पाठवणे सोयीचे होणार आहे असेही सवे यांनी सांगितले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !