BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ सप्टें, २०२२

सोलापूर पोलिसांनी पकडले जिल्ह्यातील दुचाकी चोर !


 शोध न्यूज : सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली असून माढा तालुक्यातील तीन दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल २९ दुचाकी जप्त केल्या आहेत.


अलीकडे दुचाकीच्या चोऱ्या आणि दुचाकी चोर यांची संख्या वाढतानाच दिसत आहे. एका जिल्ह्यातील चोरांची टोळी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन दुचाकी चोरतात आणि तिसरीकडेच अत्यंत कमी आणि मिळेल त्या किमतीती दुचाकीची विक्री करीत असतात. राज्याच्या विविध भागात पोलींसाना आता हे नवे काम वाढलेले असल्याचे दिसत आहे. घराच्या गेटच्या आतल्या बाजूला लावलेल्या दुचाकी देखील चोरटे कौशल्याने चोरून नेत आहेत. एखादे काम करण्यासाठी दुकान अथवा बँकेच्या बाहेर दुचाकी लावून नागरिक आत जातात. काही वेळेत काम उरकून ते परत येतात तेंव्हा त्यांची दुचाकी गायब झालेली दिसत. असे प्रकार सगळ्याच शहरात वाढीस लागले असून दुचाकी वापरणे देखील अवघड होऊन बसले आहे.

 

पोलीस परिश्रम करून दुचाकी चोर पकडतात, त्यांच्याकडून मोठ्या संख्येने दुचाकी जप्त करतात आणि संबंधित मालकास परत करतात. दुचाकी चोरांच्या टोळ्या पकडल्यामुळे आता या चोऱ्या कमी होतील असे वाटत असतानाचा पुन्हा नव्या चोऱ्या सुरूच असल्याचे दिसून येते. दुचाकीचे चोर अन्य जिल्ह्यातून येत असतील असे वाटत असताना सोलापूर पोलिसांनी पकडलेले दुचाकी चोर चक्क सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. माढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील तरुण देखील हे 'उद्योग' करीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. मोडनिंब येथील मच्छिंद्र भागवत जाडकर (वय ३६), मोडनिंब (महावीर पथ) येथील सचिन जालिंदर चव्हाण, (वय ३६) आणि माढा तालुक्यातील अरण येथील दत्तात्रय रावसाहेब शेळके (वय २५) या दुचाकी चोरांच्या सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 


चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या चोराला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याच्यासोबत इतरांची नावे देखील निष्पन्न झाली. या चोरांकडून पोलिसांनी तब्बल २९ दुचाकी जप्त केल्या असून त्यातील २७ दुचाकी मालकांचा शोध लागलेला आहे तर अन्य दोन मालकांचा शोध पोलीस घेत आहेत. सदर आरोपीकडून एकूण ८ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या २९ मोटार सायकल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. (Madha taluka gang on the brink of two-wheeler theft) ग्रामीण भागातील दुचाकीचोर असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !