शोध न्यूज : संशयास्पद दिसलेल्या वाहनाची चौकशी आणि तपासणी केली असता सोलापूर पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले असून तब्बल २९ लाखांच्या नोटा या गाडीत आढळून आल्या आहेत.
सोलापूर येथील जोडभावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत असताना सहजासहजी हे मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. सोलापूर - तुळजापूर मार्गावरील तुळजापूर नाक्याच्या जवळ असलेल्या पुलाच्या खाली वाहनाची तपासणी करीत हे पोलीस थांबलेले होते. याचवेळी तेथे एक वाहन (एम एच डी व्ही १७८६) तेथे आलेले होते. पोलिसांना पाहून हे वाहन हळू हळू पुढे सरकताना दिसले. या वाहनाच्या एकूण हालचालीवरून पोलिसांना शंका आली आणि पोलिसांनी या वाहनाला थांबण्याचा इशारा केला. वाहनचालक सय्यद मुजावर आणि क्षीरसागर असे दोघे जण वाहनात होते, वाहनाची तपासणी सुरु करताच पोलिसांना एक मोठी बॅग पोलिसांना दिसली. पोलिसांनी ती उघडून पहिली असता पोलिसांचेही डोळे दिपले एवढ्या नोटा या बॅगेत पोलिसांना दिसल्या.
गाडीत बसलेल्या दोघांच्याकडे पोलिसांनी या नोटांच्या बाबत चौकशी आणि विचारपूस केली परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचे समाधान होईल असे त्यांच्याकडे उत्तर नव्हते आणि कसली कागदपत्रे देखील नव्हती. पोलिसांनी हे वाहन पोलीस ठाण्यात आणले. गाडीतील या नोटांची मोजदाद केली असता २९ लाख ५० हजार रुपयांची ही रक्कम आढळून आली. पोलीस चौकशी करीत राहिले परंतु या नोटांच्या बाबतीत ठोस अशी काहीच माहिती त्यांना मिळू शकली नाही. (Solapur police found the money in the vehicle)पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेवून कसून चौकशी सुरु केली आहे. सदर रक्कम आणि वाहन पोलिसांनी आपल्या ताब्यात घेवून अधिक चौकशी सुरु केली आहे. आयकर विभागाला देखील याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
डॉक्टरची रक्कम ?
गाडीत असलेले वाहन चालक सय्यद मुजावर आणि क्षीरसागर या दोघांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरु केली तेंव्हा त्यांनी सदर रक्कम ही एका डॉक्टरांची असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सोलापुरातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ असलेल्या डॉक्टरांना बोलावून त्यांची चौकशी करणे सुरु केले. काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील काही डॉक्टरांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत त्यामुळे सोलापुरातील वैद्यकीय व्यवसाय वेगळ्या अर्थाने चर्चेला आलेला आहे. यातच ही रक्कम सापडली असून त्याचा संबध एका डॉक्टरांशी जोडला जात आहे. पोलिसांनी आयकर विभागाला या घटनेची माहिती दिली असून आता आयकर विभाग याची चौकशी करणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !