BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ सप्टें, २०२२

महागड्या गॅस सिलिंडरवर पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून प्रत्युत्तर !

 



शोध न्यूज : रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला नसल्याने केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना झापल्याचा निषेध व्यक्त होत असतानाच महागड्या गॅस सिलिंडरवर मोदींचे छायाचित्र लावून खाखणीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 


अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखवत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला पण हे कथित अच्छे दिन तर  आलेच नाहीत पण पहिले चांगले दिवस मात्र गेले आहेत याबाबत सतत टीका केली जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, एवढेच काय रोजच्या जीवनावश्यक वस्तूंची देखील विक्रमी महागाई झाली आहे. सामान्यांना त्याचे रोजचे गणित जुळवताना कठीण होऊ लागले आहे. प्रचंड आणि वाढत्या महागाईला लोक कंटाळून गेले असून महागाई नियमितपणे वाढत चालली असल्याचे दिसत आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात लोक संतप्त असताना रेशन दुकानात पंतप्रधान यांचा फोटो लावला नसल्यामुळे एका जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कडक शब्दात फटकारले आणि अर्ध्या तासाच्या आत दुकानात फोटो लावण्याच्या सूचना केल्या होत्या.  


स्वस्त धान्य  दुकानात पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र नसल्याचे पाहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच जिल्हाधिकारी यांना झाप झाप झापले. रेशन दुकानात पंतप्रधानांचा फोटो का नाही? असा सवाल त्यांनी जिल्हाधिकारी यांना विचारला. शिवाय अर्ध्या तासाच्या आत फोटो लावण्याबाबत तंबी दिली.  रेशन दुकानातून नाममात्र दराने दिल्या जाणाऱ्या तांदळाचे  ३० रुपये खर्च  केंद्र सरकार उचलते आणि राज्य सरकार केवळ १ रुपया देते तरीही तेलंगणात रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावत नाहीत असे सांगत सीतारामन यांनी नाराजी व्यक्त करीत संतापही व्यक्त केला.   


या प्रकाराबत विरोधकाकडून जोरदार समाचार घेतला गेला. प्रचंड दरवाढ होत असताना पेट्रोल पंपावरील पंतप्रधानांचे फोटो पाहून बऱ्याच प्रतिक्रिया उमटत राहिल्या होत्या. त्यानंतर लसीकरण प्रमाणपत्रावर देखील मोदी यांचा फोटो छापण्याचा अट्टाहास केल्याने विरोधकांनी सडकून टीका केली होती. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचे फोटो छापावेत अशी उपहासात्मक मागणी विरोधाकाकडून होत राहिली आणि आता रेशन दुकानातील फोटोचा विषय ऐरणीवर आला आहे. तेलंगाना राष्ट्र समिती अर्थात टीआरएस पक्षाच्या ट्वीटरवरून महागड्या गॅस सिलिंडरवर नरेंद्र मोदींचे फोटो लावलेला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सिलिंडरवर मोदींचा फोटो चिकटविण्यात आला असून त्यावर ११०५ रुपयांचा उल्लेख करण्यात आला आहे. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कृतीला कृतीने प्रत्युत्तर देण्यात आले असून ते अत्यंत प्रभावी ठरले आहे. स्वस्त दिल्या जात असलेल्या तांदळामुळे रेशन दुकानात फोटो हवा तर महागडया गॅस सिलिंडरवर देखील त्यांचाच फोटो हवा अशा भूमिकेतून हे प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे. "निर्मला सीतारामनजी, तुम्हाला पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हवा असेल तर घ्या" असा टोलाही लावण्यात आला आहे. त्यामुळे याची आणि सोबत वाढत्या महागाईची देखील चर्चा सुरु झाली आहे.   


मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र के. टी. रामराव यांनीही सदर प्रकरणात उडी घेत एक निवेदन जारी केले. (Photo of PM Modi on expensive gas cylinder) केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या वर्तनाने आपल्याला धक्का बसला आहे. असे त्यांनी म्हटले आहे तर  'रेशन दुकानात पंतप्रधान यांचा फोटो लावण्याची वेळ आली आहे, एवढी पातळी खालावली आहे काय' ? असा सवाल तेलंगणाचे आरोग्यमंत्री टी हरीश राव यांनी उपस्थित केला आहे.     





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !