BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ सप्टें, २०२२

शिवसेना बंडखोरीचा देखावा पोहोचला उच्च न्यायालयात !

 



शोध न्यूज : गणेशोत्सवाला सुरुवात होताच पोलिसांना वादग्रस्त वाटलेला एक देखावा थेट कोर्टात पोहोचला असून  कल्याणमधील एका गणेशोत्सव मंडळाने हा देखावा सदर केला होता. 


गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची फार मोठी जबाबदारी पोलीस यंत्रणेवर असते. यातच गणेशोत्सव मंडळ आणि पोलीस यांच्यात वादावादी होण्याच्या काही प्रसंग येत असतात. मंडळाला परवानगी मिळण्यापासून विसर्जनापर्यत कुठल्या ना कुठल्या कारणावरून पोलीस आणि मंडळे यांच्यात संघर्ष होतो. कधी मंडळांचा दुराग्रह असतो तर कधी कायदा राबविण्याचा अतिरेक होत असतो. सामाजिक अथवा धार्मिक अशी कुठलीही तेढ निर्माण होईल असे देखावे सादर करण्याला देखील पोलिसांचा विरोध असतो पण कल्याण येथील विजय तरुण मंडळाने शिवसेनेतील बंडखोरी या विषयावर एक देखावा सादर केला होता. हाच देखावा पोलिसांना आक्षेपार्ह वाटला. 


पक्षनिष्ठा विषयावरील देखावा पोलिसांनी जप्त केला त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते संतापले असून राज्य सरकारच्या दबावामुळेच पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप मंडळाने केला आहे. शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने याबाबत पोलीस उपायुक्तांची भेट घेतली असतानाच मुंबई उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे.  पक्षनिष्ठा दाखाविणाऱ्या देखाव्यावर आक्षेप घेवून पोलिसांवर दबाव आणून कारवाई केल्याबद्धल शिवसेनेने निषेध  करून भविष्यात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी दिला आहे. काल हा देखावा पोलिसांनी जप्त केला तेंव्हा शिवसेना पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते यांनी निषेध म्हणून काल मंडपातच महाआरती केली होती. 


देखाव्याचा हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला असून याबाबतची सुनावणी उद्याच होणार असल्याची माहिती महानगर प्रमुख विजय साळवे यांनी दिली आहे. गणेशोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली असताना गणेशोत्सवाचा विषयही आता न्यायालयात पोहोचला आहे.(The scene of Shiv Sena rebellion reached the High Court) न्यायालयाचा निर्णय काय होतोय याकडे आता केवळ कल्याण परिसरच नव्हे तर राज्याचेही लक्ष लागले आहे. शिवसेनेतील बंडखोरीचा विषय या देखाव्यात असल्याने याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !