BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ सप्टें, २०२२

धावत्या स्कूल बसच्या चालकाला आला हृदयविकाराचा झटका !

 


शोध न्यूज : शाळकरी विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या बसच्या चालकाला हृदय विकाराचा झटका आला पण त्यातूनही चालकाने विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले आणि मगच आपला प्राण सोडला.


बस चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका येण्याचे काही प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत पण आजचा हा प्रकार अत्यंत वेगळा आणि जीवघेणा देखील होता. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांना घेवून जाणारी ही स्कूल बस होती त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात होते. अशा परिस्थितही चालकाने आपल्या प्राणापेक्षा विद्यार्थ्याचे प्राण वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांना वाचवून आपला प्राण सोडला असल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यात आज घडली आहे. 


कांबळे नावाचे बस चालक पिंपळवाडी येथून भोगावतीकडे स्कूल बस मधून विद्यार्थ्यांना घेवून निघाले होते. सदर बस बरगेवाडी येथे आली तेंव्हा चालकाला हृदयविकाराचा झटका आला. हा झटका अत्यंत जोराचा होता. अशा वेळी काहीच सुचणे कठीण असते परंतु या चालकाचा डोळ्यापुढे आपल्यापेक्षा विद्यार्थ्यांचे जीव दिसले आणि त्याने तशाही परिस्थितीत बस बाजूला घेवून थांबवली. बसमधील सर्व विद्यार्थ्यांचे जीव वाचले पण त्याच वेळी चालक कांबळे यांनी आपला प्राण सोडला होता. काही क्षणाचा सगळा दुर्दैवी खेळ झाला होता. 


सदर घटना फक्त दोन मिनिटे आधी घडली असती तर मोठा अनर्थ निश्चित होता. दोन मिनिटांपूर्वी ही बस दरी ओलांडून पुढे येत होती. दोन मिनिटे आधी हा प्रकार घडला असता तर चालकाला काहीही करता आले नसते. चालकाला झटका आला तेंव्हा त्याला प्रचंड त्रास होऊ लागला होता, त्यातही त्याने विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. (The driver of the running school bus suffered a heart attack) या घटनेबाबत माहिती मिळाली तेंव्हा पालक प्रचंड धास्तावलेले होते. चालकाने आपले प्राण सोडले पण विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले हे घटना ऐकून पालकांकडे चालकाच्या कृतज्ञेसाठी शब्द उरले नव्हते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !