BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ सप्टें, २०२२

'ते' आमदार म्हणतात, "कुठून अवदसा आठवली आणि ----" !

 



शोध न्यूज : शिंदे गटात गेलेले आमदार आता 'कुठून आम्हाला अवदसा आठवली? असा प्रश्न उपस्थित करू लागले असून ते आता परत येण्याबाबत विचारू लागले आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

 
शिवसेना फोडून चाळीस आमदार बाहेर पडले आणि तेंव्हापासूनच या बंडखोर आमदारात अस्वस्थता असल्याचे तसेच त्यातील काही आमदार परत शिवसेनेत येण्याची शक्यता व्यक्त होत होती. परंतु अद्याप तरी तसे घडले नाही परंतु शिंदे गटातील आमदार नाराज आणि अस्वस्थ असल्याच्या बातम्या मात्र सतत येत आहेत. त्यातच शिंदे - फडणवीस सरकारचा पहिला विस्तार झाला आणि मंत्रीपद न  मिळालेले काही आमदार नाराज झाले. यातील काहींनी आपली नाराजी बोलून दाखवली तर काहीची मनातल्या मनात दाबून ठेवत दुसऱ्या विस्तारावर नजर ठेवली. दुसरा विस्तार लगेच होणार असल्याचे सांगितले गेले पण अजून तरी दुसरा विस्तार झालेला नाही. त्यात स्थानिक पातळीवर बंडखोर आमदारांना स्वीकारले जात नसल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. मंत्रीपद  मिळूनही त्यांच्या सभेस अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही हे देखील समोर आले आहे. 


शिंदे गटातील काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत असे सुरुवातीपासून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP) यांनी आता पुन्हा बंडखोर आमदारांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी, शिंदे गटात असलेली अस्वस्थता सांगितली आहे. बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले अनेक आमदार परत येण्याच्या मनस्थितीत आहेत, आम्ही परत आलो तर चालेल का? असा प्रश्न ते आता विचारू लागले आहेत असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. 'कुठून अवदसा आठवली आणि यांच्या नादाला लागलो' असे शिंदे गटातील आमदार खाजगीत बोलताना सांगत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.


शिंदे गटात गेलेल्या चाळीस आमदारांची बरखास्ती सर्वोच्च न्यायालय कधीही करू शकते. शिंदे - फडणवीस सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार आहे, त्यात शिंदे गटातील चाळीस आमदारांना मंत्री व्हायचे आहे त्यामुळे हे चाळीस आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किती त्रास देत असतील याची कल्पना आहे आणि आपली सहनुभूती मुख्यमंत्री यांचासोबत आहे. शिंदे गटातील ही अवस्था आहे तर भाजपमधील आमदार देखील नाराज आहेत. मुख्यमंत्रीपद मिळण्याऐवजी भाजपला उप मुख्यमंत्रीपद मिळाल्याने भाजपचे १०६ आमदार नाराज आहेत. हे सरकार अस्थिर असल्याचे प्रशासनाच्याही लक्षात आले आहे म्हणून अधिकारी सरकारचे ऐकत न नाहीत असे देखील पाटील म्हणाले आहेत.


शिंदे गटात गेलेले आमदार अस्वस्थ असून परत शिवसेनेत (Shivasena) येण्याची त्यांची मानसिकता आहे. खाजगीत बोलताना हे आमदार आपली खदखद व्यक्त करू लागले आहेत. कुठून अवदसा आठवली आणि यांच्या नादाला लागलो' असे ते म्हणू लागले आहेत. (Rebel MLAs' desire to join Shiv Sena, Jayant Patil's secret blast) शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे त्यामुळे अनेक जण "आम्ही परत आलो तर चालेला का?"  असे विचारू लागले आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !