BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ सप्टें, २०२२

राजीनाम्यासाठी दबाव, उपसरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

 



शोध न्यूज : सारखा राजिनामा मागितला जात असल्याने सोशल मीडियावर मेसज टाकून राष्ट्रवादीच्या उपसरपंचानी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 


अनेक कारणासाठी आत्महत्या होतात तसेच आत्मदहनाचे प्रयत्न देखील होतात पण हा प्रकार एकदम वेगळा आहे त्यामुळे या घटनेची अधिक चर्चा होऊ लागली आहे. आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपसरपंचपदी अनिल पंचरास हे कार्यरत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या पदाचा राजिनामा देण्याचा सतत दबाव येत असल्याने आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक गटातटाचे राजकारण आणि सतत राजीनामा देण्यासाठी येत असलेला दबाव यातून ही घटना घडली आहे. उपसरपंच अनिल पंचरास यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


आत्मदहन करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावरून तसा मेसेज दिला होता. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ते आत्मदहन करू लागले होते तेवढ्यात सरपंच उर्मिला धुमाळ यांनी त्यांच्या हातातील रॉकेलची बाटली हिसकावून घेतली तर सतीश थोरात यांनी काडीपेटी काढून घेतली. यामुळे संभाव्य अनर्थ टळला आहे. लोणी येथे पंचरास हे त्यांच्या प्रभागामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांना एक वर्षासाठी उपसरपंच हे पद देण्यात आले होते परंतु सहा महिन्यातच त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढू लागला. गावातील काही पुढारीही त्यांना राजिनामा देण्यास सांगत आहेत. 


सतत राजिनामा देण्यासाठी येत असलेल्या दबावाला कंटाळून त्यांनी हे पौल उचलले असल्याचे उप सरपंच पंचरास यांनीच सांगितले. आपल्याला वर्षासाठी पद दिल्यानंतर सहा महिन्यात कशासाठी राजीनामा मागितला जात आहे ? आपण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विवेक वळसे पाटील देतील तो आदेश मानायला तयार आहोत. विवेक वळसे पाटील यांनीही आपणास राजिनामा न देण्याबाबत सांगितले आहे त्यामुळे आपण राजिनामा दिला नाही. गावातील राष्ट्रवादीचेच काही पुढारी मागील महिन्यापासून राजिनामा देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत आहे असे पंचरास यांनी सांगितले.  गावात राष्ट्रवादीचे दोन तीन गट तयार झाले आहेत आणि प्रत्येकजण आपलाच गट मोठा असल्याचे दाखवत आहे. त्यांच्याकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला आणि दबावाला कंटाळल्याने आपण हे पौल उचलले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान विवेक वळसे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून त्यांनी सरपंच, उपसरपंच आणि गावातील पुढारी यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत तोडगा काढण्याचे ठरले आहे. (Pressure for resignation, sub sarpanch's attempt at self-immolation) दरम्यान पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने दाखल झाले आणि त्यांनी पंचरास यांची भेट घेतली. उपसरपंच पंचरास यांचे मनपरिवर्तन करून कुणाचा त्रास असेल तर त्याबाबत तक्रार करावी असे सांगितले.या घटनेची मात्र केवळ गावातच नव्हे तर परिसरात मोठी चर्चा सुरु झाली आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !