BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ सप्टें, २०२२

बारामतीला कशाला धडका घेताय ? अजितदादांनी उडवली भाजपची खिल्ली !

 



शोध न्यूज : बारामतीला धडाका मारून काय उपयोग? डिपॉझिटसुद्धा रहायचं नाही अशा शब्दात अत्यंत मिश्कीलपणे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. 


महाविकास आघाडीचे सरकार फोडून सत्तेत आलेल्या भाजपने आता बारामती मिशन हाती घेतले आहे. बारामती काबीज करण्याचे मानसुभे भाजपचे नेते बोलूनही दाखवत आहेत. भाजपचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी "शरद पवार हे आपले राजकीय गुरु" असल्याचे म्हटले होते पण तीच भाजप शरद पवार यांच्या साम्राज्य काबीज करण्याचा प्रयत्न करू लागली आहे. संसदरत्न असलेल्या राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याची भाषा देखील भाजपकडून करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर 'बारामतीचा किल्ला ढासळेल' अशी भविष्यवाणी केली आहे. बावनकुळे यांनी बारामतीत जाऊन काही आव्हाने देखील दिली आहेत. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बारामती काबिज करण्यावर भाष्य केले आहे. आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा गड असलेल्या बारामतीवर सत्ता काबिज करण्यासाठी भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. २०२४ च्या विजयासाठी भाजपकडून मिशन इंडिया, मिशन महाराष्ट्र सुरु असून महाराष्ट्रात बारामती येते असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपच्या या हालचालीवर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत मोजक्या शब्दात भाजपाची खिल्ली उडवली आहे. "बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही, उगाच डिपॉझिट जप्त होईल" अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपची खिल्ली उडवली.   


मागच्या वेळी आपल्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली यांच्यासहित सगळ्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते, आपल्या मतदारसंघातून लाखांचे मताधिक्य घेऊन आपण निवडून येत असतो. उगाचच बारामतीला धडका मारत बसण्यापेक्षा भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालावे असा सल्लाही पवार यांनी भाजपला दिला आहे. (
Why hit Baramati? NCP's Ajit Pawar make fun of BJP) मी रोज सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतो. प्रत्येक निवडणुकीत लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झालो आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप उत्तर द्यायला तयार नाहीत आणि सगळे सोडून बारामतीला जाऊन बसलेत असेही पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले, 

"बारामतीला धडाका मारून काय होणार आहे का ? मागं असंच मागच्या इलेक्शनला कुणाला तरी उभं केलं, म्हणलं रहा बाबा, मी कुठलंही इलेक्शन असलं तरी समोरचा माणूस ताकदवान आहे असे समजूनच इलेक्शनला उतरतो. ते ताकदवान आहे म्हणून उतरलो, त्याज्यासकट सगळ्यांची डिपॉजिटच गेली ! मला काहींनी विचारलं, अहो, हे येणार आहेत, ते येणार आहेत ! म्हटलं, येऊ दे म्हटलं, तुमच्या का पोटात दुखतंय ? आम्ही त्यांचं स्वागत करू, त्यांचा अधिकार आहे !"  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !