BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ सप्टें, २०२२

राज्यात आजपासून पावसाचे थैमान !



शोध न्यूज : पावसाचा जोर वाढू लागला असतानाच पुन्हा  सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे. 


श्री गणेशाच्या आगमनापासून राज्यात पावसाचे पुन्हा आगमन झाले असून आता आज ८ सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून कुठे मुसळधार तर कुठे अति मुसळधार पाउस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राहती घरे, दुकाने, बाजारपेठात पावसाचे  पाणी घुसले असून विजांचा कडकडाट हत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू लागला आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने आधीच व्यक्त केली असून हवामान विभागाचा अंदाज सत्यात उतरताना दिसू लागला आहे. ठाणे जिल्ह्यात तर भीतीदायक पाऊस होऊ लागला आहे आणि आणखी ताजी माहिती हवामान विभागाने दिली आहे.


मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत हा पाऊस होणार असल्याची दाट शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा पाऊस ११ सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. राज्याच्या विविध भागात काल आभाळ भरून आले आणि विजा देखील चमकू लागल्या. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला आहे. या पावसाने नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. अनपेक्षितरित्या वातावरणात बदल झालेला असून असा बदल आणखी किती काळ राहील याबाबतही हवामान विभागाने माहिती दिली आहे. आज ८ सप्टेंबर पासून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाचे होसाळीकर यांनी म्हटले आहे.  


सोलापूर जिल्ह्यासह पुणे,  कोल्हापूर, सांगली, सातारा  या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड  जिल्ह्यातही पावसाचा जोर असणार आहे. (Possibility of heavy rain in many districts of Maharashtra) उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी,हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता असून अमरावती, वाशीम, अकोला, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, , भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर,या जिल्ह्यात पाऊस थैमान घालण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !