BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ सप्टें, २०२२

आकाशात दोन विमाने अडकली एकमेकांत आणि ---- (VDO)

  


शोध न्यूज : रस्त्यावर वाहनांची टक्कर होऊन अपघात होतात हे सामान्य आहे पण आकाशात दोन विमानांची टक्कर झालेली कधी ऐकण्यात नाही, पण असाही एक अपघात झाला असून दोन पायलटचा यात मृत्यू झाला आहे. 


रस्त्यारस्त्यावर वाहनांची टक्कर होते, रेल्वे देखील एकमेकांना धडकतात आणि अपघात होतात. अशा अपघाताबाबत सर्वांनाच माहित आहे आणि अशा प्रकरचे अनेक व्हिडीओ देखील पहायला मिळालेले असतात. विमानाचेही अपघात होतात, विमान जमिनीवर कोसळते आणि मोठी आग भडकते. पण आकाशात मात्र दोन विमाने धडकली असल्याचा व्हिडीओ कधीच पहायला मिळालेला नाही. यापूर्वी विमाने धडकण्याची ही पहिलीच घटना आहे असे नाही. सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ मिळतात पण आकाशातील अपघाताचा एक व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशात दोन विमाने सहसा कधी एकमेकासमोर येत नाहीत त्यामुळे त्यांच्यात टक्कर होण्याचा विषय येत नाही. परंतु अशी दुर्मिळ असलेली घटना देखील आकाशात घडली आहे. 


आकाशातील दोन विमाने केवळ एकमेकांना धडकली नाहीत तर ती एकमेकात अडकली आणि मग कुणालाच उडता येईना! दोन्ही विमाने परस्परात जखडली गेली आणि मग दोन्ही मिळूनच जमिनीवर (Plane crash)कोसळली. विशेष म्हणजे ही दुर्मिळ दुर्घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, दोन विमाने आकाशात उडताना दिसत आहेत. या दोन्ही विमानात फारसे अंतरही नाही. ही दोन्ही विमाने उडता उडता जवळ एकमेकांच्या जवळ येतात आणि  नंतर ती परस्परांशी धडकून एकमेकात अडकतात. त्यानंतर मात्र त्यांना खाली येण्याशिवाय पर्याय उरत नाही. एखादा कापलेला पतंग आकाशातून थेट खाली यावा तसे ही दोन्ही विमाने मिळून जमिनीच्या दिशेने वेगाने येतात. जमिनीवर कोसळताच धुराचे उंच उंच लोट फक्त उरतात. 


या अपघाताबाबत प्राप्त माहितीनुसार मिरर फ्लाईटसाठी दोन पायलट ट्रेनिंग घेत असताना समांतर उड्डाणे घेत असतात. या दोन्ही विमानाचे पायलट नवखे तर नव्हतेच पण या दोघांनीही एरोबेटिक्समध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप किताब पटकाविलेला होता. (Two planes got stuck in the sky and ---) हे दोघे एकसमान ट्रेनिंग घेत होते आणि याचवेळी दोघांचेही मशीन परस्परात अडकले आणि ही दुर्मिळ मोठी दुर्घटना घडली. चला पाहू या या विमान अपघाताचा  व्हिडीओ ! (व्हिडीओ पाहण्यासाठी खालील ओळीला टच करा) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !