BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ सप्टें, २०२२

आणखी एक महिला सरपंच बेपत्ता झाल्या पण ---

 


शोध न्यूज : कवठे येथील महिला सरपंच अजूनही बेपत्ता असताना सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक महिला सरपंच बेपत्ता झाल्या परंतु पोलिसांनी केवळ ४८ तासांच्या आत त्यांचा शोध घेतला आहे.


उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे ग्रामपंचायतीच्या सरपंच ७ सप्टेंबरपासून अचानक बेपत्ता आहेत. वीस बावीस दिवस उलटूनही भाभी सापडू शकत नाहीत अथवा त्यांच्याबाबत काहीच माहिती उपलब्ध होत नाही . या घटनेचे रहस्य वाढीला लागले असून पोलिसांनी सगळ्या प्रकारे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आणि नातेवाईक सरपंच भाभींचा शोध घेत असूनही यात कसलीही माहिती मिळत नाही की कसले धागेदोरे देखील उपलब्ध होत नाहीत. भाभी अचानक बेपत्ता झाल्याने चिंता व्यक्त होत होती परंतु आता या घटनेतील गुंतागुंत आणि रहस्य वाढताना दिसत आहे. या घटनेचा गुंता सुटण्याआधीच सोलापूर जिल्ह्यात आणखी एक प्रकरण समोर आले परंतु पोलिसांनी तातडीने हा गुंता सोडवला आहे. 


बार्शी तालुक्यातील सौंदरे ग्रामपंचायत महिला सरपंच गेल्या चार ते पाच दिवसांपासून अचानक गायब झाल्या आणि पुन्हा एकाच खळबळ उडाली. एका महिला सरपंचांचा शोध लागत नसतांनाच दुसऱ्या एक महिला सरपंच बेपत्ता झाल्या त्यामुळे चक्रावून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणखी एक महिला सरपंच बेपत्ता झाल्यामुळे पोलीस अधिकच सतर्क झाले आणि शोधासाठी यंत्रणा कामाला लागली. अखेर पोलिसांनी ४८ तासांच्या आत शोध लावण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान ही खबर राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचली होती आणि महिला आयोगाने देखील यात लक्ष घातले होते.  रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील एका आश्रमात सौंदरे येथील महिला सरपंच सापडल्या असून पोलिसांनी त्यांना कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. 


सौंदरे गावाच्या महिला सरपंच बेपत्ता झाल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीच पण गावातील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी गाव सोडले अशी चर्चा जिल्हाभर पसरली. पोलिसांनी त्यांचे वर्णन आणि छायाचित्रे राज्यातील सगळ्या पोलीस ठाण्याला पाठवली तसेच सोशल मीडियाची देखील मदत घेतली गेली. सोशल मीडियात आलेली माहिती पाहून काहींनी याबाबत दापोली पोलीसाना याबाबत माहिती दिली. सदर महिला सरपंच या पावस येथील आश्रमात आहेत ही माहिती काही लोकांकडून पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी आश्रमात जाऊन पाहणी केली आणि तेथे सौदरे येथील बेपत्ता झालेल्या महिला सरपंच आढळून आल्या. त्यानंतर पोलसांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. अखेर महिला सरपंच सुखरूप त्यांच्या गावी पोहोचल्या आहेत. 


केवळ ४८ तासांच्या आत बेपत्ता महिला सरपंच यांचा शोध लागू शकला. राज्य महिला आयोगापर्यंत ही बातमी पोहोचली होती आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्वीट केले होते. (Another woman sarpanch went missing but ---) गावातील कोणत्या लोकांकडून महिला सरपंच यांना त्रास होता काय ? याची माहिती घेवून संबंधितावर कारवाई करावी असे आदेश राज्य आयोगाने दिले होते परंतु सरपंच महिला बेपत्ता झाल्याबाबत कोणतीही फिर्याद देण्यात आली नव्हती.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !