BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ सप्टें, २०२२

प्रवासी बसचा ब्रेक झाला फेल आणि बस थेट नदीत !

 



शोध न्यूज : धावत्या प्रवासी बसचा ब्रेक अचानक फेल झाला आणि प्रवासी घेवून जाणारी ही बस थेट पूर आलेल्या नदीत घुसली. या घटनेने प्रवाशांनी श्वास रोखले होते. 


धावती वाहने पेट घेतात, अचानक काही अपघात होतात आणि कधी कधी वाहनांचे ब्रेक फेल होतात आणि मोठे अपघात होतात. वेगात असलेल्या वाहनांचे ब्रेक अचानक फेल झाले तर समोर मोठा अनर्थ दिसत असतो. अनेकदा चालक प्रसंगावधान दाखवत आणि आपला अनुभव पणाला लावत वाहनावर नियंत्रण मिळवत असतात पण हे अशक्य झाले तर मात्र अनर्थ निश्चित असतो. नाशिकच्या गोदापात्रात देखील आज एका अशीच घटना घडली आणि धावत्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट नदीच्या पाण्यात पोहोचली. बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. 


नाशिक परिसरात मुसळधार पाउस सुरु आहे आणि यामुळे नद्या नाले तुडूंब भरून वाहात आहेत. अशा परिस्थितीत एक प्रवासी बस धावत आली आणि थेट नदीच्या पात्रात गेली. (Godavari river) शहरातील गाडगे महाराज पुलाजवळ ही अत्यंत थरारक अशी घटना घडली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले गेले आहे. अचानकपणे ही बस नदीच्या पात्रात गेली आणि तेथे अडकली असल्याची माहिती मिळताच नागरिक आणि पोलीस घटनास्थळी धावत सुटले. बस नदीत अडकली आणि प्रवासी बसमध्ये अडकले आहेत. बसमध्ये प्रवास करीत असलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.


सदर बस ही परराज्यातील पर्यटकांना घेवून नाशिक येथे आली होती आणि ती गाडगे महाराज पुलाजवळ आली तेंव्हा बसचे ब्रेक लागलेच नाहीत त्यामुळे बस थेट नदीत शिरली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. ब्रेक फेल होऊनही आणि बस नदीच्या पात्रात जाऊनही प्रवासी बचावले आहेत. (Passenger bus brake failure, bus in river) काही क्षण प्रवासी प्रचंड घाबरले होते आणि त्यांनी आरडाओरडा केला पण बसचे नियंत्रण चालकाच्या हाती उरले नव्हते. चालक प्रयत्न करूनही काही करू शकत नव्हता. काही क्षण अत्यंत थरारक गेले पण एकही प्रवाशाला काही झाले नाही.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !